नवी दिल्ली | आगामी निवडणुकांआधी देशात सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. भाजपने तर विरोधी पक्षामधील प्रमुख नेत्यांना फोडत त्या पक्षांचं खच्चीकरण करायला सुरूवात केलीये. देशात निवडणूका होण्याआधी भाजपने सगळ्या मतदारसंघात फिल्डिंग लावायला सुरूवात केली आहे. राज्यात राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन प्रमुख पक्षांना फोडत महायुती केली आहे. तर इतर राज्यातही भाजपने रणनिती आखल्या आहेत. यंदाची निवडणुकीमध्ये आता जनता कोणाच्या हातात सत्ता देते हे काही दिवसात स्पष्ट होईल. त्याआधी निवडणूक आयोगाकडून आकडेवारी आली आहे.
देशात एकूण 96.88 कोटी मतदार असल्याचं निवडणूक आयोगाने सांगितलं आहे. जगातील सर्वाधिक मतदार भारत देशामध्ये असल्याचं निवडणुक आयोगाकडून सांगण्यात आलं आहे. आगामी लोकसभा 2024 निवडणुकीमध्ये हेच 96.88 कोटी मतदार देशात कोणाची सत्ता ठेवायची याचा निर्णय घेणार आहेत. हा एक मोठा विक्रम होणार आहे.
मतदार म्हणून ज्या नवीन नोंदी झाल्या त्यामध्ये सहा टक्के नवीन मतदारांची भर पडल्याचे दिसून आलं आहे. या आकडेवारीमध्ये 18 ते 29 वयोगटातील दोन कोटी नवीन मतदारांनी नोंदणी केली आहे. ज्या नवीन मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यामध्ये महिलांचं प्रमाण जास्त आहे. 2.63 कोटी नवीन मतदारांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी 1.41 कोटी महिला मतदार आहेत. तर यातील पुरुष मतदारांची संख्या केवळ 1.22 कोटी आहे.
दरम्यान, देशात एकूण 96 कोटी 88 लाख 21 हजार 926 मतदार आहेत. यामध्ये 49 कोटी 72 लाख 31 हजार 994 पुरुष तर 47 कोटी 15 लाख 41 हजार 888 महिला मतदार आहेत. देशातील राजस्थान या राज्यामध्ये सर्वाधिक 5 कोटींहून अधिक मतदार आहेत. 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्यात 5.32 कोटींहून अधिक मतदारांची नोंदणी झाल्याची माहिती राजस्थानचे मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) प्रवीण गुप्ता यांनी दिली.