Pallavi Dempo : भाजपने दक्षिण गोवा लोकसभा निवडणुकीत उद्योगपती श्रीनिवास डेम्पो यांची पत्नी पल्लवी डेम्पो यांना मैदानात उतरवले आहे. पल्लवी यांनी मंगळवारी त्यांचा उमदेवारी अर्ज दाकल केला. निवडणूक अधिकाऱ्याकडे त्यांनी 119 पानी प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. या शपथपत्रानुसार, पती श्रीनिवास डेम्पो यांच्यासह त्यांची एकूण संपत्ती 1,400 कोटी रुपये आहे. डेम्पो समूहाचा व्यवसाय फुटबॉल लीगच्या फ्रंचाईजीपासून ते रिअल इस्टेट, जहाज निर्मिती, शिक्षण, खाण, खनिजकर्म उद्योगापर्यंत पसरलेला आहे.
पल्लवी आहेत धनकुबेर
- पल्लवी डेम्पो यांच्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्या संपत्तीची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार, त्यांच्याकडे 255.4 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आहे. तर त्यांचे पती श्रीनिवास यांच्याकडील या संपत्तीचे मूल्य आजच्या बाजाराभावाप्रमाणे 994.8 कोटी रुपये इतके आहे. तर पल्लवी यांच्याकडे 28.2 स्थावर मालमत्ता आहे. तर पतीकडे 83.2 कोटींची मालमत्ता आहे.
- श्रीनिवास यांच्याकडे गोवा, देशात पण अनेक ठिकाणी मालमत्ता आहेत. इतकेच नाही तर या दाम्पत्याकडे दुबईत पण एक अपार्टमेंट आहे. त्याचे सध्याचे बाजारमूल्य 2.5 कोटी रुपये आहे. इंग्लंडची राजधानी लंडनमध्ये पण या दाम्पत्याच्या नावे एक अपार्टमेंट आहे. तिचे सध्याचे बाजारमूल्य 10 कोटींच्या घरात आहे. देशातील मालमत्ता पण कोट्यवधींच्या घरात आहे.
- पल्लवी डेम्पो यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्याकडे सध्याच्या घडीला 5.7 कोटींचे सोने आहे. पल्लवी यांनी आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 10 कोटी रुपयांचा आयकर रिटर्न दाखल केला होता. श्रीनिवास यांनी त्याच वर्षासाठी 11 कोटी रुपयांचा रिटर्न दाखल केला होता. 49 वर्षीय भाजप उमेदवार पल्लवी यांचे शिक्षण पुण्यातील एमआयटीमध्ये झालेले आहे. त्यांनी बिझनेस मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली आहे.
- त्यांनी निवडणूक अधिकाऱ्याकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्याकडे 217.11 कोटींचे बाँड, जवळपास 12.92 कोटींची बचत, 2.54 कोटींच्या कार, जवळपास 5.69 कोटींचे सोने, तर इतर 9.75 कोटी रुपयांच्या वस्तू आहेत.पल्लवी डेम्पो यांनीच नाही तर उत्तर गोव्यातून उमेदवार श्रीपाद नाईक यांनी सुद्धा मंगळवारी लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला. गोव्यात लोकसभेचे दोन मतदारसंघ आहेत.