अमित शाह यांची फोनाफोनी, मित्र पक्षांना डिनर, दिल्लीत राजकीय घडामोडी वाढल्या

| Updated on: Jun 05, 2024 | 10:45 AM

Amit Shah NDA : लोकसभा निकालानंतर दिल्लीत हालचालींना वेग आला आहे. सरकार स्थापन करण्यासाठी दिल्लीत मोठी घडामोड होत आहे. NDA ने डिनर डिप्लोमसीमधून मित्र पक्षांशी संवादाचा मार्ग निवडला आहे. दिल्लीत घडामोडींना वेग आला आहे. भाजपने एनडीए मधील सर्व मित्र पक्षांची चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे.

अमित शाह यांची फोनाफोनी, मित्र पक्षांना डिनर, दिल्लीत राजकीय घडामोडी वाढल्या
डिनर डिप्लोपसी, दिल्लीत वाढल्या घडामोडी
Follow us on

दिल्लीत सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपला यावेळी मित्रांचा खास गरज आहे. जुन्या आणि नवीन मित्रांच्या बळावर भाजप सत्तेत तिसऱ्यांदा परत येत आहे. लोकसभा निकालानंतर दिल्लीत घडामोडींना वेग आला आहे. सरकार स्थापन करण्यासाठीच्या हालचालींना वेग आला आहे. 1 खासदार निवडून आलेल्या मित्रांना पण दिल्लीत येण्यासाठी सांगावा धाडण्यात आला आहे. सरकार स्थापन करण्यासाठी दिल्लीत मोठी घडामोड होत आहे. NDA ने डिनर डिप्लोमसीमधून मित्र पक्षांशी संवादाचा मार्ग निवडला आहे. यंदा 400 पारचा नारा दिला असताना भाजपच्या नेतृत्वातील एनडीएला 300 जागांचा आकडा गाठता आला नाही. त्यातच इंडिया आघाडीने जोरदार कामगिरी करुन दाखवली आहे. भाजपला मित्र पक्षांचा मोठा आधार मिळाला आहे.

मित्र पक्षांना धाडला सांगावा

भाजपच्या वरिष्ठ नेते मित्र पक्षांची चर्चा करत आहेत. तर काल रात्री अमित शहा यांनी मित्र पक्षाशी संवाद साधला आहे. त्यांनी फोनवरून एनडीए मधील सर्व मित्र पक्षांची चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली. मोदींच्या नेतृत्वाखाली सर्व पक्ष सरकार स्थापन करण्यास तयार असल्याचे या चर्चेतून समोर आले. आज होणाऱ्या एनडीएच्या बैठकीत सरकार स्थापनेवर शिक्कामोर्तब केले जाणार असल्याची माहिती सूत्रां दिली आहे.

हे सुद्धा वाचा

राष्ट्रपतींकडून समोरोपीय भोजन

नवी दिल्लीत आज मोठ्या घडामोडी घडत आहे. आज रात्री राष्ट्रपतींकडून डिनरच आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपचे वरिष्ठ मंत्री डिनरला जाणार आहेत.राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्याकडून समारोपीय डीनरचे आयोजन करण्यात आले आहे.

NDA च्या बैठकीला अजित पवारांना निमंत्रण

एनडीएच्या बैठकीसाठी अजित पवारांना निमंत्रण देण्यात आले आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस हजर राहणार आहे. तर चर्चेतही राष्ट्रवादी सहभागी होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून प्रफुल्ल पटेल हे उपस्थित असतील. आज दिल्लीत ही बैठक होत आहे. बैठकीत एनडीएचे सरकार स्थापन करण्याची चर्चा होईल. यात मित्र पक्षांच्या अपेक्षांना पण महत्व आले आहे. त्यांना मंत्रिमंडळातील कोणते स्थान द्यायचे यावर खल होईल. तसेच मित्रपक्षांच्या अपेक्षा पण विचारात घेण्यात येतील.