खासदारांनो, जेवणाचे आता पूर्ण पैसे भरा, केंद्राचा मोठा निर्णय

| Updated on: Jan 19, 2021 | 6:28 PM

लोकसभा आणि राज्यसभा सदस्यांना संसदेच्या कँटिनमध्ये सबसिडीच्या दरात मिळणार जेवण बंद होणार असल्याची माहिती लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिली. (Lok Sabha Speaker Om Birla)

खासदारांनो, जेवणाचे आता पूर्ण पैसे भरा, केंद्राचा मोठा निर्णय
संसदेत मिळणाऱ्या जेवणावरील सबसिडी बंद करण्यात आलीय.
Follow us on

नवी दिल्ली : लोकसभा आणि राज्यसभा सदस्यांना संसदेच्या कँटिनमध्ये सबसिडीच्या दरात मिळणार जेवण बंद होणार आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी याबाबत माहिती दिली आहे. ओम बिर्ला म्हणाले,”संसद सदस्य आणि इतरांना संसदेच्या कँटिनमधील जेवणावर दिली जाणारी सबसिडी थांबवण्यात आली आहे. संसदेती कँटीन आता इंडियन टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन चालवणार आहे. यापूर्वी ही जबाबदारी उत्तर रेल्वेकडे होती. (Lok Sabha Speaker Om Birla said subsidy for canteen food served to MPs is cancel from budget session)

कँटिनमधील जेवणची किमंत

लोकसभा आणि राज्यसभा सदस्यांना नाममात्र दरात जेवण मिळत होते. जेवणाच्या एका थाळीची किंमत 35 रुपये होती. केंद्र सरकारडून सबसिडी दिली जात असल्यामुळे इतक्या कमी रकमेत जेवण दिले जात असे. मात्र, खासदारांच्या जेवणावरील सबसिडी बंद केल्यामुळे केंद्र सरकारचे 8 कोटी रुपये वाचणार आहेत.

29 जानेवारीपासून संसदेचे बजेट अधिवेशन

संसेदेचे बजेट अधिवेशन 29 जानेवारीपासून सुरु होणार आहे. 29 जानेवारीला सकाळच्या सत्रात राज्यसभेचे कामकाज सुरु होईल तर दुपारच्या सत्रात लोकसभेचे कामकाज सुरु असेल, अशी माहिती ओम बिर्ला यांनी दिली. राज्यसभेचे कामकाज सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत चालणार आहे. तर, लोकसभेचे कामगकाज सायंकाळी 4 ते 8 वाजेपर्यंत सुरु राहील.

कोरोना विषयक नियमांची अंमलबजावणी

बजेट अधिवशेनता कोरोना विषयक नियमांची अंमबलबजावणी करण्यात येणार आहे. सर्व खासदारांना अधिवेशन सुरु होण्यापूर्वी कोरोना चाचणी करावी लागणार आहे. खासदारांच्या निवासस्थानाजवळ आरटीपीसीआर टेस्ट करण्याची सोय उपलब्ध करुन दिली जाणार असल्याची माहिती ओम बिर्ला यांनी दिली. संसदेच्या परिसरात 27 आणि 28 जानेवारील आरटीपीसीआर टेस्ट केल्या जाणार आहेत. संसदेतील कर्मचाऱ्यांच्या देखील कोरोना टेस्ट केल्या जाणार आहेत, अशी माहिती बिर्ला यांनी दिली.

संबंधित बातम्या:

तिन्ही कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांची वाट लागणार, मोदी, भाजपला घाबरत नाही: राहुल गांधी

Fact Check: लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची मुलगी परीक्षा न देताच बनली IAS?

(Lok Sabha Speaker Om Birla said subsidy for canteen food served to MPs is cancel from budget session)