Sonia-Rajiv Gandhi Love Story : लंडनमध्ये पहिल्या नजरेतलं प्रेम, घरातून आधी नकार…मग दिल्लीतलं बिग बीचं घर बनले माहेर

| Updated on: Dec 09, 2024 | 2:04 PM

कॉंग्रेसचा तीन दशके कारभार सांभाळणाऱ्या सोनिया गांधी यांचा आज ( ९ डिसेंबर ) जन्म दिवस आहे, त्या आता राज्यसभेच्या खासदार आहेत.सोनिया गांधी माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांची प्रेमकहाणी मोठी रंजक आहे.

Sonia-Rajiv Gandhi Love Story : लंडनमध्ये पहिल्या नजरेतलं प्रेम, घरातून आधी नकार...मग दिल्लीतलं बिग बीचं घर बनले माहेर
Sonia-Rajiv Gandhi Love Story
Follow us on

कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचा आज ( ९ डिसेंबर ) जन्म दिवस आहे. सोनिया गांधी ७८ वर्षांच्या झाल्या आहेत. आता त्या राज्यसभेच्या सदस्य आहेत. गेल्या तीन दशकांपासून त्या कॉंग्रेसचे नेतृत्व करीत आहेत. त्यांचा जन्म इटलीत झाला आणि लंडनच्या क्रेंब्रिज युनिव्हर्सिटीत त्यांचे शिक्षण झाले. तेथेच त्यांची भेट राजीव गांधी यांच्याशी झाली होती.दोघांत मैत्री झाली आणि त्याचं रुपांतर प्रेमात झाले. त्यांची लव्ह स्टोरी कमी रंजक नाही. सोनियांच्या पालकांना तिने भारतात जाऊन राजीव यांच्याशी लग्न करणे अजिबात पसंत नव्हते…

सोनिया ७ जानेवारी १९६५ रोजी केंब्रिज विद्यापीठात अभ्यासासाठी आल्या. लंडनमधील हा परिसर शिक्षणासाठी परदेशातून येणाऱ्या सुरक्षित आणि पॉश विभाग आहे.त्यांनी दोन मुख्य लॅंग्वेज स्कूल पैकी एकात प्रवेश घतला आहे. तेथे विद्यापीठाने त्यांच्या रहाण्याची व्यवस्था केली. तेथील जेवण त्यांना पसंद नव्हते. तसेच इंग्रजी बोलताना त्यांना अडचण होती. तेथील कॅंपसमध्ये ग्रीक रेस्टॉरंटमध्ये इटालियन फूड मिळत होते. वर्सिटी नावाच्या या रेस्तारात सोनिया जेवणासाठी येऊ लागल्या.येथे राजीव गांधी मित्रांसोबत जेवायला यायचे कारण हे रेस्तरां विद्यार्थ्यांसाठी परवडणारे होते.

जेव्हा पहिल्यांदा सोनियांनी राजीवना पाहीले

येथे सोनिया यांनी राजीव यांना पाहिले. त्यांचा शांत स्वभाव आणि विनम्र वागणे इतरांहून वेगळे होते. तेव्हा सोनिया येथे लंच घेत होत्या तेव्हा राजीव त्यांचे एक कॉमन मित्र क्रिस्टियन वॉन स्टीगलिज यांच्या सोबत येथे आणि त्यांचा परिचय एकमेकांशी झाला. सोनिया गांधी यांच्या बायोग्राफी “सोनिया गांधी-एन एक्स्ट्राआर्डिनरी लाईफ, एन इंडियन डेस्टिनी”त लेखिका राणी सिंह यांनी लिहीलेय की त्यांना पहिल्या नजरेत राजीव यांच्याशी प्रेम जुळलं. असाच प्रकार राजीव यांचाही झाला होता. राजीव यांनी त्यांना सांगितले होते की त्यांनी क्रिस्टीयन याच्याशी सोनियांशी ओळख करुन देण्यास सांगितले होते.’

हे सुद्धा वाचा

पत्रातून आईला कळविले

त्यानंतर राजीव आणि सोनिया यांची मैत्री प्रेमात बदलली. राजीव गांधी हे आई इंदिरा गांधी यांना पत्रातून येथील सर्व बाबी सांगत असत. लंडन येथील कॅंपस, अभ्यास, रुटीन लाईफ आणि सर्वच बाबी ते आईला सांगत असत. असेच त्यांनी सोनिया यांच्याबद्दल देखील आईला सांगितले.

राजीव यांच्याकडे जुनी लाल रंगाची कार

राजीव गांधी यांच्याकडे तेव्हा लाल रंगाची जुनी वॉक्सवॅगन कार होती. ते सोनियांना त्यांच्या घरी भेटायला यायचे. तसेच ते कार रेसिंग पाहायला सोनिया यांच्या सोबत सिल्व्हर स्टोन येथे जायचे. आज देखील सिल्व्हर स्टोन कार रेसिंगसाठी जगप्रसिद्ध ट्रॅक आहे.अनेक फॉर्म्युला वन टीमने या ट्रॅकला आपला बेस बनविला आहे.

राजीव बेकरीत काम करायचे

केंब्रिजमध्ये शिकायला आलेल्या विद्यार्थ्यांना घरातून कमी पैसे यायचे त्यामुळे अनेक जण रिकाम्यावेळात छोटीमोटी कामे करायचे. त्यामुळे राजीव गांधी एक सहकारी बेकरीत काम करायचे ते ब्रेड सेक्शनमध्ये काम करायते. सोनिया यांना मात्र घरातून चांगला पॉकेटमनी मिळायचा. त्या नेहमीच वेल ड्रेस्ड आणि आनंदी उत्साही असायच्या. राजीव यांना फोटोग्राफीचा छंद होता. ते सोनिया यांचे सतत फोटो काढायचे. त्यानंतर सोनियांसाठी राजीव एकदम खास बनले. तो काळ त्यांच्यासाठी फुलपाखारांसारखा स्वप्नाळू काळ होता.

इंदिरा पहिल्यांदा सोनियांना भेटल्या

राजीव गांधी यांनी इंदिरा यांना पत्रातून सोनिया यांच्याबद्दल लिहीले होते. आणि तिला भेटायला सांगितले होते. त्यावेळी इंदिरा गांधी या पंतप्रधान लालबहादूर शास्री यांच्या सरकारमध्ये माहिती आणि प्रसारण मंत्री होत्या. इंदिरा यांना लंडनला काम होते. तेव्हा सोनिया यांना इंदिरा भेटणार होत्या. सोनिया खूपच नर्व्हस होत्या. पहिली भेट झाली. त्यानंतर लागलीच दुसरी भेट लंडनच्या केनिंगटन पॅलेस गार्डनर येथील भारतीय दुतावासात झाली.

इंदिरा गांधी यांनी सोनिया यांना या भेटीत रिलॅक्स करण्याचा प्रयत्न केला.त्यांनी सोनिया गांधी यांच्याशी फ्रेंच भाषेत संवाद केला. कारण त्यांना इंग्रजी पेक्षा फ्रेंचमध्ये बोलण्यास काही अडचण येणार नाही हे त्यांना माहिती होते. त्यांनी अभ्यासाबद्दल विचारले. दुसरीकडे सोनिया यांच्या घरचे या नात्याबदद्ल नाराज होते.

सोनियांचे घरचे होते नाराज

सोनिया यांनी राजीव यांच्याशी नात्याबद्दल आपल्या घरी काही सांगितलेले नव्हते. राजीव यांनी पत्र लिहून आईला कळविले की सोनिया तिच्या घरच्यांना का सांगत नाहीए हे कळण्यापलिकडे आहे. परंतू सोनिया यांना राजीव यांच्याशी लग्न करायचे होते. जेव्हा त्या इटलीतील ओरबासानो येथील घरी आता सर्व काही सांगायचे असे ठरवूनच गेली होती. परंतू घरातले नाराज झाले, ती नाराज होऊन पुन्हा क्रेंबिजला आली. परंतू हे सर्व कळाल्यानंतर घरातले तिला केंब्रिजला देखील सोडत नव्हते.

राजीव यांनी आता मॅकेनिकल इंजिनिअरिंग कोर्ससाठी लंडनच्या इंम्पिरियल कॉलेजात प्रवेश घेतला होता, आता त्यांची भेट कमी होऊ लागली. दोघांनी आपले जीवन एकत्र व्यतित करण्याच्या शपथा घेतल्या होत्या. परंतू भविष्याबद्दल देखील त्यांना चिंता सतावू लागली. सोनियांना त्यांच्या वडिलांच्या कडक स्वभावाची भिती वाटत होती. तरीही त्यांनी लग्न करुन भारतात राहायला जाण्याचा निर्णय घेतला.

सोनिया इटलीला गेल्या

जुलै १९६६ मध्ये सोनिया पुन्हा इटलीला जाण्याचा आणि त्यांनी वडील स्टेफनो यांची भेट घेण्याचा निर्णय घेतला, त्यांना त्यासाठी एक बांधकाम साईटवर काम करुन आवश्यक पैसा जमा केला. सोनिया आणि राजीव एकमेकांच्या पत्राद्वारे संपर्कात होते.दुसरीकडे राजीव यांनी इंजिनिअरींगचा अभ्यास सोडून पायलट लायसन्स घेण्याचे प्रशिक्षण सुरु केले होते.

राजीव इटलीला गेले

नोव्हेंबर १९६६ राजीव इटलीला गेले. त्यांनी सोनियांच्या पालकांची भेट घेतली. राजीव सोनिया यांच्या पालकांना पसंद पडले. त्यांना पटले की राजीव एक चांगले व्यक्ती आहेत. परंतू तरीही लग्नाला त्यांचा अजूनही होकार नव्हता. त्यांना त्यांती मुलगी परदेशात कशी राहील याची काळजी लागली होती.

सोनिया यांच्या वडीलांनी एक अट ठेवली

सोनिया यांच्या पुस्तकाच्या लेखिका म्हणतात की वडिलांनी या नात्यात पुढे जाऊ नये म्हणून मुलीला खूप समजावले. परंतू जेव्हा त्यांना कळले की सोनिया ऐकणार नाहीत तेव्हा त्यांनी एक अट ठेवली, दोघांना लग्नासाठी एक वर्षभर वाट पाहावी. आणि तरीही त्यांचे प्रेम टिकले तरच सोनिया यांना राजीव यांच्या सोबत सोडण्यास आपण तयार होऊ अशी अट घातली म्हणजे लग्नानंतर त्यांचे पटले नाही तर आपल्यावर मुलीने आरोप करू नये अशी त्यांची इच्छा होती.

एक वर्षांनंतर सोनिया दिल्ली एअरपोर्टवर उतरल्या

सोनिया यांनी १२ महिने वाट पाहीली, स्टेफनो यांना वाटले होते की मुलगी वर्षभर इटलीत राहीली तर ती राजीव यांना विसरुन जाईल, परंतू असे काही झाले नाही. १३ जानेवारी १९६८ मध्ये सोनिया दिल्ली विमानतळावर उतरल्या. तेव्हा त्यांना घ्यायला राजीव त्यांचे बंधू संजय यांच्या सोबत आले होते.

बच्चन यांचे घर बनले माहेर …

सोनिया यांच्या राहण्याची व्यवस्था अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबियांकडे केली होती. येथे त्या राजीव यांच्याशी विवाह होईपर्यंत राहील्या. अमिताभ बच्चन आणि त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा सांभाळ केला. बच्चन कुटुंबियांनी सोनियांना दिल्ली फिरवून दाखविली, लग्नाआधी बच्चन यांचे घर सोनिया यांचे माहेरच बनले होते. नंतर येथेच त्यांचे राजीव यांच्याशी २५ फेब्रुवारी १९६८ रोजी लग्न झाले.
अशी आहे सोनिया गांधी आणि राजीव गांधी यांची अनोखी लव्ह स्टोरी….