नवी दिल्लीः लेफ्टिनेंट जनरल मनोज पांडे यांची आता देशाच्या सेना प्रमुखपदी त्यांची नव्याने नियुक्ती केली जाणार आहे. मनोज पांडे सेना प्रमुख बनणारे हे पहिले इंजिनीयर आहेत. त्यांच्या नियुक्तीला नुकताच केंद्र सरकारकडून ग्रीन सिग्नल देण्यात आला आहे. या महिन्याच्या अखेरीस 30 एप्रिल रोजी लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांच्याकडे भारतीय लष्कराची कमान सोपवण्यात येणार आहे. सध्याचे लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे या महिन्याच्या अखेरीपर्यंत निवृत्त होणार असून त्यानंतर मनोज पांडे यांच्याकडे हा कार्यभार सोपवला जाणार आहे.
Lt Gen Manoj Pande would be the 29th Chief of Army Staff and would be succeeding General Manoj Mukund Naravane who is scheduled to superannuate on April 30 pic.twitter.com/jBn1gANl7m
— ANI (@ANI) April 18, 2022
आपल्या ३७ वर्षांच्या सेवेत लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांनी ऑपरेशन विजय आणि ऑपरेशन पराक्रममध्ये सक्रिय सहभाग घेतला होता. यामध्ये त्यांच्या कामगिरीबद्दल कौतुकही करण्यात आले होते.
सेना दलातील काही उच्च पदस्थ अधिकारी गेल्या तीन महिन्यात निवृत्त झाले आहेत, त्यामध्येसुद्धा पांडये हे सगळ्यांमध्ये ज्येष्ठ आहेत. याआधी आर्मी ट्रेनिंग कमांडचे (एआरटीआरएसी) प्रमुख लेफ्टनंट जनरल राज शुक्ला 31 मार्च रोजी निवृत्त झाले आहेत. तर जानेवारी महिन्यात काही वरिष्ठ अधिकारी निवृत्त झाले आहेत. लेफ्टनंट जनरल सीपी मोहंती आणि लेफ्टनंट जनरल वायके जोशी हे 31 जानेवारीला निवृत्त झाले आहेत.
लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांनी 39 वर्षांच्या लष्करी कारकिर्दीत वेस्टर्न थिएटरमध्ये इंजिनियर ब्रिगेड, नियंत्रण रेषेजवळ पायदळ ब्रिगेड, लडाख सेक्टरमधील माउंटन डिव्हिजन आणि ईशान्येकडील कॉर्प्सचे नेतृत्व केले आहे. ईस्टर्न कमांडचा पदभार स्वीकारण्यापूर्वी ते अंदमान आणि निकोबार कमांडचे कमांडर-इन-चीफ म्हणूनही त्यांनी पदभार यशस्वीपणे सांभाळला होता.
संबंधित बातम्या
अकरावीच्या प्रवेशाचे नियोजित वेळापत्रक जाहीर ; जाणून घ्या तपशीलवार माहिती
Sangli Sabha : सांगलीत महापालिका महासभेत प्रचंड गदारोळ, महिला नगरसेवकांनी राजदंड पळवला