मध्यप्रदेश : मागच्या पंधरा दिवसांपूर्वी मध्यप्रदेश राज्यालील देवास (Madhya pradesh, devas) जिल्ह्यात एक घटना घडली. ही घटना संपूर्ण देशात सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झाली. एखाद्या शेळी सारखा बिबट्या (leopard video devas) तिथल्या लोकांसोबत खेळत असल्याचे संपूर्ण देशाने व्हिडीओच्या माध्यमातून पाहिले. ज्यावेळी वन विभागाला या प्रकरणाची माहिती मिळाली, त्यावेळी त्यांनी बिबट्याला ताब्यात घेतले. त्याच्या आरोग्याची चौकशी केल्यानंतर धक्कादायक गोष्टी उजेडात आल्या आहेत. एखाद्या शेळीसारखा बिबट्या लोकांच्यात फिरत होता. त्या बिबट्याला एक आजार झाला होता. त्यामुळे त्याने त्याचं मानसिक संतुलन बिघडलं होतं. विशेष म्हणजे त्या बिबट्याला कुत्र्यांमध्ये एक आजार (Canine Distemper) आढळला जातो. तो आजार झाल्याचं स्पष्ट झालं आहे.
ज्यावेळी बिबट्याची आरोग्य तपासणी केली. त्यावेळी समजलं की केनाइन डिस्टेंपर (Canine Distemper) नावाचा आजार बिबट्याला झाला आहे. त्यामुळे त्या बिबट्याला काहीचं सुचत नव्हतं, तो त्याचं अस्तित्व गमावून बसला होता. या कारणामुळे तिथल्या गावकऱ्यांनी त्याला पकडला आणि त्यांच्यासोबत बिबट्या खेळला सुध्दा. ज्यावेळी तिथले काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यावेळी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तिथं धाव घेतली.
सध्या बिबट्याला जो आजार झाला आहे. तो आजार कुत्र्यांमध्ये आढळतो. हा आजार एकदा शरिरात घुसल्यानंतर तुमच्या शरिरात मोठे बदल होतात. आजार झाल्यानंतर खतरनाक मधील खतरनाक जनावर सुध्दा एक शांत होतं. मध्यप्रदेश राज्यातील देवास जिल्ह्यातील इकलेरा गावात कालीसिंध नदीच्या किनारी बिबट्या दिसला होता. त्यावेळी तिथं बिबट्या पाहायला लोकांनी मोठी गर्दी केली होती.
तिथला काही जागृत नागरिकांनी याची माहिती वनविभागाला दिली. ज्यावेळी वनविभागाचे पथक तिथं दाखल झाले, त्यावेळी त्यांनी जाहीर केले की, बिबट्याची तब्येत सध्या ठीक नाही. त्यानंतर बिबट्याला डॉक्टरांकडे नेण्यातं आलं. डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवल्यानंतर त्याच्या काही तपासण्या करण्यात आल्या, त्यावेळी बिबट्याला केनाइन डिस्टेंपर नावाचा आजार झाल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं.