नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढताना दिसत आहे. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये खबरदारी म्हणून निर्बंध लादले जात आहेत. मध्यप्रदेशमध्ये देखील राज्य सरकारने 1 ली ते 8 वीपर्यंतची शाळा बंद करण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयानुसार 15 एप्रिल 2021 पर्यंत मध्यप्रदेशमधील सर्व शाळा बंद असणार आहेत. याआधी मध्यप्रदेशमध्ये 31 मार्च 2021 पर्यंत सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले होते (Madhya Pradesh government order to close Schools amid increasing corona patient).
मध्य प्रदेश सरकारने बोर्डाच्या परीक्षांचा विचार करुन 18 डिसेंबरपासून 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. यानुसार विद्यार्थी आपल्या पालकांचं संमतीपत्र सादर करुन शाळेत उपस्थित राहू शकत होते.
#COVID19 के संक्रमण में विगत दिनों में हो रही वृद्धि को दृष्टिगत रखते हुए सभी शासकीय एवं अशासकीय स्कूल कक्षा 1 से 8वीं तक कक्षाओं को दिनांक 15 अप्रैल 2021 तक बंद रखेंगे। कक्षा 9 से 12वीं तक की कक्षाओं के लिए पूर्व में जारी किये गये निर्देश यथावत रहेंगे। @Indersinghsjp pic.twitter.com/Z7WlYTQ1sR
— School Education Department, MP (@schooledump) March 30, 2021
या काळात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचेही निर्देश शाळांना देण्यात आले होते. त्यामुळे मास्कचा आणि सॅनिटायझरचा वापर आणि शारीरिक अंतर ठेवत या शाळा सुरु झाल्या. मात्र, आता पुन्हा वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
हेही वाचा :
25 वर्षावरील सहव्याधीग्रस्त तरुणांनाही कोरोना लस द्या, राज्य मोदी सरकारकडे मागणी करणार
महाराष्ट्रात कोरोना रुग्ण वाढत असताना मोदींना पाकिस्तानची चिंता : नाना पटोले
Soni Razdan | रणबीरला कोरोना होताच आलियाच्या आईने केला उद्धव सरकारला प्रश्न! म्हणाल्या…
व्हिडीओ पाहा :
Madhya Pradesh government order to close Schools amid increasing corona patient