मध्य प्रदेशातलं महाकाल लोक सज्ज, पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज भव्य शुभारंभ

| Updated on: Oct 11, 2022 | 11:33 AM

या सोहळ्याला देशभरातील जवळपास 600 पेक्षा जास्त साधू संत तसेच कलाकारांना आमंत्रित करण्यात आलंय. शंखनाद आणि मंत्रोच्चाराने या कार्यक्रमाची सुरुवात होईल. महाकाल लोक उभारण्यासाठी जवळपास 856 कोटी रुपयांचा खर्च आलाय.

मध्य प्रदेशातलं महाकाल लोक सज्ज, पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज भव्य शुभारंभ
Image Credit source: social media
Follow us on

उज्जैनः  12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या उज्जैन येथील महाकालेश्वराच्या मंदिराजवळ आज एक भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय आहे. या मंदिराभोवती महाकाल लोक उभारण्यात आलंय. या मंदिदरात जाण्यासाठी विशेष कॉरिडोअर बांधण्यात आलाय. यात शिवकालीन कथा भित्तीचित्र आणि मूर्तींद्वारे जिवंत करण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते आज या महाकाल लोकचं (Mahakal Lok) लोकार्पण केलं जाईल. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chauhan) यांच्या नेतृत्वात या भव्य दिव्य कार्यक्रमाची जंगी तयारी करण्यात आली आहे.

महाकाल लोक परिसरात भगवान शंकराच्या कथांवर आधारीत 190 मूर्ती स्थापन करण्यात आल्या आहेत. तसेच कॉरिडोअरमध्ये शिवकालीन कथानकं सांगणारे 180 स्तंभ असतील. या संपूर्ण परिसरात 8 मोठ्या मूर्ती असतील, ज्या इथे येणाऱ्या भक्तांना आकर्षइत करतील.

या परिसरात नटराज, शिवपुत्र गणपती, कार्तिकेय, दत्तात्रय अवतार, पंचमुखी हनुमान, चंद्रशेखर महादेवाची कथा, शिव आणि सती यासह समुद्र मंथनाचा देखावाही उभारण्यात आला आहे.

या भव्य परिसरात  15  फूट उंचीच्या 23 मूर्ती उभारण्यात आल्या आहेत. तसेच ११ फुटांच्या १७ मूर्ती आहेत.

महाकाल लोकच्या प्रवेशद्वारावननर गणपती, अर्धनारी नटेश्वर, अष्ट भैरव, भारद्वाज ऋषींह इतर ऋषींच्या मूर्ती आहेत.

पाहा महाकाल लोक नेमकं काय आहे?

26 फुट उंचीचं भव्य नंदी द्वार हेदेखील महाकाल लोक येथील मोठं आकर्षण ठरतंय.

आज संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा महाकाल लोकचा लोकार्पण सोहळा संपन्न होतोय. यासाठी उज्जैनमध्ये आज सकाळपासूनच सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे.