मध्य प्रदेश : 84 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर 8 वर्षांच्या तन्मयला 400 फूट खोल खड्ड्यातून बाहेर काढण्यात आलं. पण तोपर्यंत फार उशीर झाला. तन्मयचा मृत्यू झाला होता. बोअरवेलच्या खड्ड्यात अडकलेल्या तन्मयला बाहेर काढल्यानंतर तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित करताना त्याच्या आईवडिलांच्या अश्रूंचा बांध फुटला. त्याच्या आईवडिलांनी मुलाच्या मृत्यूमुळे केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता.
गेल्या तीन दिवसांपेक्षा जास्त वेळ तन्मयला वाचवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करण्यात आली होती. पण अखेर त्याची प्राणज्योत मालवली. त्याच्या मृत्यूबाबत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीहीह दुःख व्यक्त केलं आहे. तसंच तन्मयच्या कुटुंबीयांना चार लाख रुपयांची आर्थिक मदतही देण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.
तन्मय साहू असं मृत्यू झालेल्या 8 वर्षीय मुलाचं पूर्ण नाव आहे. तो बोअरवेलच्या खड्ड्यात पडल्याचं कळल्यानंतर तातडीने बचाव यंत्रणा कामाला लागल्या होत्या. त्याला बोअरवेलमधून बाहेर काढण्यासाठी समांतर खड्डा खणण्यात आला होता. 12 फूट लांब सुरंग लावून 44 फूट खोल खड्डा खणला गेला होता. पण रात्री उशिरा तन्मयकडून कोणताच प्रतिसाद मिळत नसल्यानं चिंता आणखी वाढली होती.
#WATCH मध्य प्रदेश | बैतूल ज़िले के मंडावी गांव में 6 दिसंबर को 55 फीट गहरे बोरवेल में गिरे बच्चे तन्मय को निकाल लिया गया है। बच्चे की मृत्यु हो गई है: बैतूल ज़िला प्रशासन pic.twitter.com/x7WP7y5V0v
— ANI_HindiNews (@AHindinews) December 10, 2022
80 तासांपासून त्याने काही खाल्लेलं नव्हतं. त्यामुळे त्याची प्रकृती अधिक गंभीर बनली होती. त्याला बोअरवेलमधून बाहेर काढल्यानंतर रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आलं. पण त्याचा मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त केली जाते आहे.
तन्मयला बाहेर काढताना खड्ड्यातील पाणी आणि दगड यांच्यामुळे अडचणी निर्माण होत होत्या. तन्मय 400 फूट खोल खड्ड्यात 39 फुटांवर अडकला गेला होता. तब्बल 61 जवान तन्मयला वाचवण्यासाठी प्रयत्न करत होते. यात एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या पथकांनी मिळून रेस्क्यू ऑपरेशन केलं होतं. 84 तासांनी तन्मयला बाहेर काढण्यात यश आलं. पण त्याचा जीव वाचू शकला नाही.
Madhya Pradesh Shivraj Singh Chouhan condoles the demise of 8-year-old Tanmay Sahu who fell into a borewell in Betul on 6th December and was brought out today.
He announces an ex-gratia of Rs 4 Lakhs to the bereaved family. pic.twitter.com/m5iq0k9Lrw
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) December 10, 2022
मंगळवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान तन्मय खेळत होता. मैदानात खेळता खेळता तो अचानक बोअरवेलच्या खड्ड्यात पडला. मध्य प्रदेशच्या बैतूल जिल्ह्यातील तन्मय बोअरवेलच्या खड्ड्यात पडल्याचं कळल्यानंतर तातडीने बचावयंत्रणा कामाला लागल्या होत्या. पण तन्मयला वाचवण्यात यश न आल्यानं हळहळ व्यक्त केली जातेय.