नामिबियातून आणलेल्या चित्त्याबाबत मोठी अपडेट समोर, व्हिडीओ व्हायरल!

| Updated on: Apr 03, 2023 | 12:41 AM

बिबट्या दिसणं दूरच पण बिबट्या आला हे कानावर आलं तरी लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होतं. अशीच एक भीतीदायक घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात ओबान नावाचा चित्ता बाहेर आला आहे.

नामिबियातून आणलेल्या चित्त्याबाबत मोठी अपडेट समोर, व्हिडीओ व्हायरल!
Follow us on

भोपाळ : बिबट्याचा लोकांवर हल्ला होण्याच्या अनेक घटना कानावर पडतात. भर दिवसा बिबटे मानववस्तीमध्ये घुसून हल्ला करत असल्याचं दिसत आहेत. त्यामुळे बिबट्या दिसणं दूरच पण बिबट्या आला हे कानावर आलं तरी लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होतं. अशीच एक भीतीदायक घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात ओबान नावाचा चित्ता बाहेर आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

नामिबियातून आणलेल्या चित्त्यांपैकी एक ओबान चित्ता कुनो राष्ट्रीय उद्यानापासून 20 किमी अंतरावर असलेल्या विजयपूरच्या झार बडोदा गावात गेला आहे. त्यामुळे वनविभागाची रेस्क्यू टीमही त्याचा शोध घेण्यासाठी झार बडोदा गावात पोहोचली असल्याची माहिती डीएफओ यांनी दिली आहे.

मध्य प्रदेशच्या (मध्य प्रदेश) श्योपूर जिल्ह्यात असलेल्या कुनो नॅशनल पार्कमधून ‘ओबान’ नर चित्ता अचानक बेपत्ता झालाय. त्याच्या तपासासाठी वन विभागाची चार पथके कार्यरत आहेत. कुनो नॅशनल पार्कचे डीएफओ पीके वर्मा यांनी सांगितले की, लोकेशन ट्रेसनुसार चित्ता गावाच्या आजूबाजूच्या शेतात बसला आहे. त्याला कुनो नॅशनल पार्कमध्ये परत आणण्यासाठी एक टीम त्याच्या मागावर आहे.

 

दरम्यान, कुनो राष्ट्रीय उद्यानचे फील्ड डायरेक्टर उत्तम शर्मा यांनी सांगितलं की, ‘आम्ही ओबेनच्या प्रत्येक हालचालीवर सतत लक्ष ठेवून आहोत. तसंच, ओबेनच्या मानेवर कॉलर आयडी आहे, त्यामुळे वनविभागाची टीम त्याला ट्रॅक करत आहे. सध्या ओबानला शोधण्यात वनविभागाची पथके गुंतली आहेत.