Mahakumbh 2025 : केवळ कुंभ मेळ्यातच नागा साधूचं अस्तित्व का जाणवतं,काय आहे यामागे कारण?

| Updated on: Dec 19, 2024 | 1:10 PM

महाकुंभ मेळा १२ वर्षांतून एकदा भरतो. हिंदू धर्मासाठी अत्यंत पवित्र असलेल्या कुंभ मेळाव्यात हजारो सांधूंचे संमेलनच भरत असते. या सोहळा दर १२ वर्षांनी विशेष स्थानी आयोजित केला जातो. यंदा उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे हा सोहळा आहे. या दिवशी लाखो साधु- संतांसोबत सामान्य श्रद्धाळू देखील पवित्र नदीत स्नान करतात. कुंभ मेळ्यातील स्नानामुळे सर्व पापांपासून मुक्ती मिळते अशी मान्यता असून मोक्ष प्रात्प होतो असे म्हटले जाते.

Mahakumbh 2025 : केवळ कुंभ मेळ्यातच नागा साधूचं अस्तित्व का जाणवतं,काय आहे यामागे कारण?
Follow us on

कुंभ मेळा हा धार्मिकदृष्ट्या खूपच महत्वाचा मानला जातो. या कुंभ मेळ्याव्यात अनेक ठिकाणाच्या आखाड्याचे साधु आणि संत हजर होत असतात. या सांधुपैकी नागा साधू देखील असतात. हे साधू केवळ कुंभ स्नानाच्या वेळीच दिसतात.नागाबाबा हिंदू धर्मातील एक रहस्यमय तपस्या करणारे साधू आहेत. ते नग्न असतात तसेच युद्धकलेत निपुण असतात. सर्वांगाला भस्म लावलेल्या या नागा साधूंना कुंभ मेळाव्यात खूपच मान असतो. ते वेगवेगळ्या आखाड्यातून येत असतात. नागा बाबा भारतीय सनातन परंपरेतील साधू असून ते कठोर तपश्चा करीत असतात. कठोर तपश्चा, वैराग्य आणि आध्यात्मिक साधनेचे जीवन ते जगत असतात. कुंभ मेळावा हा दर १२ वर्षांनी एकदा आयोजित केला जातो. हिंदू धर्मात त्याचे विशेष आध्यात्मिक आणि धार्मिक महत्व आहे. महाकुंभ मेळाव्यात शाही स्नानाचे महत्व खूप असते. या शाही स्नानाची वाट प्रत्येक साधू संत मोठ्या आतुरतेने पाहात असतो.

नागा साधू समाजापासून वेगळे राहाण्याचा आणि साधना तसेच तपश्चर्येचा संकल्प केलेला असतो. त्यामुळे ते लोकांपासून दरू एकांतात राहाणे पसंत करतात. सार्वजनिक ठिकाणी ते केवळ विशेष समारंभ आणि कुंभ मेळाव्यातच प्रकट होतात.नागा बाबा शिवभक्त असतात. त्यांच्यासाठी कुंभ मेळा एक विशेष संधी असते. कुंभ मेळाव्यात विभिन्न अखाड्याचे नागाबाबा एकमेकांना भेटतात. विचारांचे अदानप्रदान करतात. आपले सामाजिक बंधन मजबूत करतात. कुंभ मेळाव्यात नागाबाबांना आपली परंपरा, ज्ञान आणि साधनेचे प्रदर्शन करण्याची संधी मिळते. कुंभ मेळाव्यात गंगा, यमुना आणि सरस्वतीच्या संगमात शाही स्नानाचे वेगळे महत्व होते. हे स्नान आत्मा शुद्ध करणे आणि मोक्ष प्राप्तीचे माध्यम मानले जाते. नागा बाबा या खास मुहुर्तावर १२ वर्षानंतर स्नान करुन आपले तप आणि साधन सिद्ध करतात.

नागा साधूंचे वैशिष्ट्ये –

नागा साधू सर्वसाधारणपणे नग्न रहातात.केवळ धोतर आणि लंगोट घालतात.ते आभाळाला आपले वस्र मानतात

हे सुद्धा वाचा

नागा साधू युद्धकलेत निपुण असतात. ते तलवार, त्रिशुल आणि अन्य हत्यारांचा उपयोग करणे जाणतात

ते कठोर तपस्या करतात,थंड पाण्याने अंघोळ करतात, भोजन त्याग करतात

नागा साधू भगवान शिवाचे परम भक्त असतात. विविध आखाड्यांशी ते संलग्न असतात. उदा. जुना आखाडा. निरंजनी आखाडा आदी.

नागा साधूंचे जीवन –

नागा बाबांचे जीवन खूपच साधारण असते. ते भोजन करताना संयम राखतात. योग आणि ध्यान करतात.आणि धार्मिक अनुष्ठानात भाग घेतात. आणि कुंभ मेळ्यानंतर ते कुठेही दिसत नाहीत कारण ते सर्वसाधारणपणे जंगलात किंवा डोंगरदरीत राहात असतात.

महाकुंभाचे धार्मिक महत्व –

महाकुंभ हिंदू धर्मात सर्वात मोठा आणि पवित्र सणापैकी एक आहे. हा गंगा, यमुना आणि  सरस्वती सारख्या पवित्र नदी संगमात स्नान करण्यासाठी येतात. महाकुंभाची उत्पत्ती पौराणिक कथांशी जोडलेली आहे. असे म्हटले जाते की देवता आणि दानवात अमृत कलशावरुन युद्ध झाले तेव्हा अमृताचे काही थेंब पृथ्वीवर पडले. ते थेंब जेथे पडले त्या चार ठिकाणांवर कुंभ मेळे भरु लागले. महाकुंभात नदीत स्नान केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि मोक्ष प्राप्ती होते. कुंभ मेळ्यात स्नान केल्याने सर्व देवतांचा आशीर्वाद मिळतो अशी मान्यता आहे. यंदाचा कुंभमेळा उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे भरणार आहे.