नवी दिल्ली: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील भाजपचे डझनभर नेते दिल्लीत जाऊन आले. या नेत्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. भाजपचे हे सर्व नेते कालच महाराष्ट्रात आले. त्यानंतर लगेचच आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यामुळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. या दिल्ली दौऱ्यात राज्यपाल कोश्यारी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार का? याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे. (Maharashtra Governor bhagat singh koshyari reached in delhi, will meet modi-shah?)
राज्यपाल भगतसिंह कोशारी दिल्लीत दाखल झाले आहेत. महाराष्ट्र सदनमध्ये त्यांचा मुक्काम राहणार आहे. महाराष्ट्र सदनमध्ये त्यांना मुख्यमंत्र्यांचा विशेष सुट देण्यात आला आहे. राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांसाठी महाराष्ट्र सदनमध्ये वेगवेगळे सुट राखीव असतात. मात्र गेल्या आठवड्यात राज्यपाल सुटला आग लागली होती. त्यामुळे या सुटचं बरंचसं नुकसान झालं असून त्याच्या दुरुस्तीचं काम सुरू आहे. त्यामुळेच राज्यपालांच्या राहण्याची व्यवस्था मुख्यमंत्र्यांच्या सुटमध्ये करण्यात आली आहे. मात्र, राज्यपाल दिल्लीत किती दिवसाच्या दौऱ्यावर आलेत याबाबतची माहिती गुलदस्त्यात आहेत. तसेच राज्यपालांच्या दिल्लीवारीचं नेमकं कारणंही सांगण्यात आलेलं नाही.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी दिल्लीत येताच उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी त्यांना भेटायला आले आहेत. कोश्यारी हे उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आहेत. तसेच उत्तराखंडचे ते भाजपचे मोठे नेते आहेत. त्यामुळे राज्यातील राजकीय परिस्थिती आणि प्रशासकीय कामकाजावर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होणार असल्याचं सांगितलं जातं.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या दिल्ली दौऱ्याचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही. या दौऱ्यात ते कुणाकुणाला भेटणार आहेत हे अद्याप सांगण्यात आलेलं नाही. दिल्ली दौऱ्यात ते पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. या भेटीत महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर चर्चा होणार असल्याचीही चर्चा आहे.
भाजपचे महाराष्ट्रातील डझनभर नेते दिल्लीत आले होते. हे नेते तीन दिवस दिल्लीत होते. राज्यातील या नेत्यांनी दिल्लीतील महत्त्वाच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या होत्या. तसेच संघटनात्मक बाबींवर आणि महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर या दौऱ्यात चर्चा झाली होती. मात्र, महाराष्ट्रातील हे नेते राज्यात परतताच कोश्यारी यांनी दिल्ली गाठल्याने त्याचे अनेक अर्थ लावले जात आहेत. त्यामुळे राज्यपालांच्या दिल्ली दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (Maharashtra Governor bhagat singh koshyari reached in delhi, will meet modi-shah?)
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 3 PM | 10 August 2021https://t.co/jE9FwqCuvt#sanjayraut | #BJP | #shivsena
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 10, 2021
संबंधित बातम्या:
आरक्षण तर भाजपच देईल म्हणणाऱ्या दानवेंचं तोंड बंद का होतं?; विनायक राऊत बरसले
राज, उद्धव यांचं सांगू नका, माझा मुलगा नगरपालिकेच्या शाळेत शिकतो, बच्चू कडूंचं रोखठोक उत्तर
राज ठाकरेंसोबत झालेल्या भेटीबाबत जेपी नड्डांशी चर्चा झाली; चंद्रकांत पाटील यांचं मोठं विधान
(Maharashtra Governor bhagat singh koshyari reached in delhi, will meet modi-shah?)