मकर संक्रांतीचा देशभरात उत्साह दिसून येत आहे. या उत्सवाहात पतंग उडवण्याची मजा काही औरच आहे. उत्तरायणाच्या या पर्वात देशाचे केंद्रीय मंत्री अमित शाह यांना सुद्धा मोह आवरला नाही. त्यांनी पतंगाची दोर हातात घेतली. पतंगांनी भरलेल्या आकाशात त्यांच्या पतंगाने भरारी घेतली. ढील दे, ढील दे दे रे भैया… इस पतंग को ढील दे असा माहोल तयार झाला नी त्यांच्याच एका समर्थकाने त्यांचा पतंग कापला. त्यावेळी एकच जल्लोष झाला. पतंग कापल्यानंतर अमित शाह यांनी तो कुठे हरवला हे सुद्धा निरीक्षण केले. यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे पण उपस्थित होते.
उत्तरायण पतंग महोत्सवात सहभागी
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल या दोघांनी अहमदाबाद शहरात मकर संक्रांतीचा उत्सव आठवणीत साठवला. अमित शाह आणि भूपेंद्र पटेल हे अहमदाबाद शहरातील ‘उत्तरायण पतंग महोत्सवात’ सहभागी झाले. यावेळी त्यांनी स्थानिक लोकांशी चर्चा केली. याठिकाणी त्यांच्या समर्थकांनी आणि जनतेने त्यांचे स्वागत केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मकर संक्रांतीला पतंग उडवण्याचा आनंद लुटला. यावेळी एकच जल्लोष झाला.
समर्थकानेच कापली पतंग
अमित शाह हे एका इमारतीच्या छतावर दिसत आहेत. ते पतंग उडवत आहेत. आजूबाजूचे लोक जल्लोष करत आहेत. तर केंद्रीय गृहमंत्र्यांना पतंग उडवताना पाहण्यासाठी इमारतीच्या गच्चीवर लोकांनी गर्दी केल्याचे दिसून येते. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे अमित शाह यांच्याजवळ उभे होते. तर अमित शाह हे पतंग उडवत होते. हा जल्लोष सुरू असतानाच शेजारील इमारतीवरील एका तरुणाने अमित शाह यांचा पतंग कापला. पतंग कापल्याचे शाह यांच्या लगेच लक्षात आले. त्यांनी त्या तरुणाचा पण तात्काळ नजरेने शोध घेतला. अमित शाह यांनी या तरुणाकडे इशारा केल्याचे दिसून आले.
आज तो @AmitShah अमित काका की पतंग कट गई।
अमित काका 😁 pic.twitter.com/PhX9gXgDXO
— Shri Aacharya Ji (@IMightyWarrior) January 14, 2025
अमित शाह यांच्या मकर संक्रांतीच्या शुभेच्छा
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सकाळी मकर संक्रांतीच्या देशवासियांना शुभेच्छा दिल्या. मकर संक्रांती, भारतीय संस्कृती आणि पंरपरेतील श्रद्धेचे एक प्रतिक आहे, देशातील नागरिकांची ऊर्जा, उत्साह आणि प्रगती साधणाऱ्या या सणाच्या शुभेच्छा असे ट्वीट त्यांनी केले.