नवी दिल्ली : काँग्रेसमध्ये पक्षाध्यक्षपदाच्या मुद्द्यावरुन जोरदार अंतर्गत राजकारण सुरु आहे. त्यावर आता दिल्ली काँग्रेसनं पुन्हा एकदा राहुल गांधी यांना पक्षाध्यक्ष करा असा प्रस्ताव मंजूर केला आहे. त्यातबरोबर दिल्ली काँग्रेसनं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्याच्या मागणीचाही प्रस्ताव मंजूर केला आहे. गृहमंत्री अमित शाह आणि दिल्लीतील केजरीवाल सरकार प्रत्येक प्रश्नावर फेल झाल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे.(Make Rahul Gandhi Congress President again, Delhi Congress proposal)
देशातील अशांतता आणि कठीण राजकीय स्थितीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला राहुल गांधी यांच्यासारख्या डायनॅमिक आणि ताकदवान नेत्याची गरज आहे, असं वक्तव्य दिल्ली काँग्रेसचे प्रमुख अनिल कुमार यांनी प्रस्ताव सादर करताना केलंय. राहुल गांधी हे मोदी सरकारनं केलेल्या चुकीच्या कामांना लोकांसमोर आणण्यासाठी संकल्पित आहेत. तसंच काँग्रेस कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा विश्वास देण्यासाठी आणि त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी काँग्रेसची धुरा पुन्हा एकदा राहुल गांधी यांच्या हातात देणं गरजेचं असल्याचं मत अनिल कुमार यांनी व्यक्त केलं आहे.
Rahul ji is only one who can inspire Congress workers. All his predictions are coming true from farmers issue to ills of GST. He’s shown his leadership ability. So we passed resolution to make him Congress president again: Delhi Pradesh Congress Committee President Anil Chaudhary https://t.co/FjfBOEUMJn pic.twitter.com/c3tlSTee2B
— ANI (@ANI) January 31, 2021
देशाला विनाशाच्या मार्गावर जाण्यापासून वाचवण्यासाठी आणि पक्षाला मजबूत नेतृत्व देण्यासाठी काँग्रेसला राहुल गांधी यांची गरज आहे. ज्या माध्यमातून काँग्रेस प्रतिगामी, सत्तावादी आणि लोकशाहीला मारक असणाऱ्या ताकदींविरोधात लढा उभा करु शकेल, असं दिल्ली काँग्रेसनं मंजूर केलेल्या प्रस्तावात म्हटलं आहे.
शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर राहुल गांधी यांची भविष्यवाणी खरी ठरली आहे. या माध्यमातून राहुल गांधी यांची क्षमता लक्षात येते. त्यामुळे पक्षानं पुन्हा एकदा राहुल गांधी यांना अध्यक्ष करावं. कारण फक्त राहुल गांधीच आता काँग्रेस कार्यकर्त्यांना प्रेरित करु शकतात, असंही अनिल कुमार म्हणाले.
संबंधित बातम्या :
एक इंचही मागे हटू नका, मी तुमच्यासोबत, राहुल गांधींचं शेतकऱ्यांना आवाहन
कृषी कायद्यांवर विरोधक आक्रमक, राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर 16 विरोधी पक्षांचा बहिष्कार
Make Rahul Gandhi Congress President again, Delhi Congress proposal