बेंगळुरू: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांची बुधवारी काँग्रेसच्या नूतन अध्यक्षपदी (Congress President) निवड करण्यात आली. सीताराम केसरी यांच्या कार्यकाळानंतर (1996-1998) मल्लिकार्जुन खरगे हे पहिलेच गांधी घराण्याबाहेरील अध्यक्ष बनले आहेत. मल्लिकार्जुन खरगे यांनी त्यांच्या राजकीय आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. राजकीय संघर्ष त्यांना नवा नसला तरी त्यांनी त्यांच्या आयुष्यातील संघर्षालाच वयाच्या सातव्या वर्षीपासून सुरू केला होता. ते अवघ्या सात वर्षाचे असतानाच त्यांनी आपल्या आई आणि बहिणीला (Sister) आपल्या डोळ्यांसमोर त्यांना जिवंत जळताना पाहिले होते आणि त्या परिस्थितीही ते काहीच करू शकले नव्हते.
हैदराबादच्या निजामाच्या रझाकारांच्या खासगी सैन्यांकडून त्यांची घरं जाळण्यात आली होती. 1948 मध्ये घडलेली ही दुःखद घटना अद्यापपर्यंत त्यांनी कधी जाहीररित्या उघड केली नव्हती.
मल्लिकार्जुन खरगे यांचा मुलगा प्रियांकने एका वृत्तवाहिनीशी बोलताना खरगे यांच्या आयुष्यातील ही घटना सांगिगतली होती. या घटनेत त्यांचे वडील मल्लिकार्जुन आणि आजोबा मप्पाण्णा त्या दुर्घटनेतून कसे वाचले होते हेही त्यांनी सांगितले आहे.
प्रियांकने सांगतो की, निजामाच्या रझाकारांनी संपूर्ण परिसरात घरांची तोडफोड केली होती. घरं लुटली होती आणि हल्लेही केले होते.
त्यावेळच्या हैदराबादसह भालकी, कर्नाटकातील आधुनिक बिदर जिल्ह्यातील इतर अनेक गावांप्रमाणे महाराष्ट्राताली अनेक गावांना वेढा घालण्यात आला होता.
त्यांचे आजोबा शेतात काम करत होते. त्यावेळी एका शेजाऱ्याने त्यांना येऊन सांगितले की, तुमचे घर रझाकारांनी पेटवले आहे. त्यावेळी त्यांचय्या आजोबांनी पळत जाऊन फक्त मल्लिकार्जुन खरगेंनाच फक्त वाचवू शकले.
बाकी घरातील त्यांची आजी, काकू हे मात्र जळत्या घरात जळून खाक झाले.
रझाकार हे हैदराबादच्या निजामाचे खाजगी सैन्य किंवा मिलिशिया होते. ज्यांनी निजामांविरुद्ध स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या शेकडो ‘क्रांतिकारकांना’च ठार मारले होते.
जेव्हा भारत इंग्रजांपासून स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करत होता. तेव्हा हैदराबादमधील लोक मजलिस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीनच्या बॅनरखाली या अर्धसैनिक दलाच्या विरोधात लढत होते.
15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा मीर उस्मान अली खान यांच्या तत्कालीन निजामाच्या अधिपत्याखाली तिरंगा फडकवणे हा गुन्हा मानला जात होता.
कर्नाटक, महाराष्ट्र आणि तेलंगणा यांचा समावेश असलेल्या हैदराबाद या आपल्या संस्थानाचे उर्वरित भारतात विलीनीकरण करण्यास त्यांनी नकार दिला होता.
ऑपरेशन पोलो ही लष्करी मोहीम भारत सरकारने हैदराबादला भारताच्या अधिपत्याखाली आणण्यासाठी सुरू केली होती.
हैदराबाद राज्याचे भारतीय संघराज्यात विलीनीकरण करणे हे त्याचे उद्दिष्ट होते, जे त्यावेळी निजामाच्या अधिपत्याखाली होते.
मल्लिकार्जुन खर्गे यांचा जन्म 1942 मध्ये कर्नाटकातील बिदर जिल्ह्यातील वरवट्टी या लहानशा गावात झाला.
खरगे यांचे चिरंजीव प्रियांक सांगतात की, त्या हल्ल्यानंतर माझे वडील आणि आजोबा जीवाच्या भीतीने एका झाडीत लपून बसले होते.मग त्यानी माझ्या आजोबांच्या भावाला भेटायचे ठरवले, जे सैन्यात कार्यरत होते मात्र ते पुण्यात तैनात होते.
पुणे गाठण्यासाठी त्यांनी सुमारे आठवडाभर बैलगाडीतून प्रवास केला. त्यांना भेटल्यानंतर माझे आजोबा आणि काका पुन्हा गुलबर्गा (आताचे कलबुर्गी) येथे गेले आणि त्यांनी त्यांच्या जीवनाला नव्याने सुरूवात केली.
एमएसके मिल्स या कापड गिरणीत नोकरी मिळाल्यानंतर खरगे यांनी शिक्षण पूर्ण केले आणि याच महाविद्यालयातून बीए केल्यानंतर गुलबर्गा विधी महाविद्यालयातून कायद्याची पदवीही त्यांनी घेतली.