मोरबी दुर्घटनेवरुन ममतादिदीही मैदानात, तपास एजन्सींच्या कारभारावरच ठेवलं बोट

| Updated on: Nov 02, 2022 | 5:01 PM

मोरबी ही राजकारण करण्याची गोष्ट नाही मात्र या दुर्घटनेची न्यायिक समितीद्वारे चौकशी करणे गरजेचे असल्याचे मत ममता बॅनर्जींनी व्यक्त केले आहे.

मोरबी दुर्घटनेवरुन ममतादिदीही मैदानात, तपास एजन्सींच्या कारभारावरच ठेवलं बोट
Follow us on

नवी दिल्लीः गुजरातमधील मोरबी पुलाची दुर्घटना घडल्यानंतर आता देशातील राजकारण प्रचंड तापले आहे. जुलता पूल कोसळल्यानंतर त्यामध्ये 130 लोकांचा जीव गेल्याने आणि अनेक जण बेपत्ता असल्याने गुजरात सरकारवर जोरदार टीका होत आहे. त्यामध्ये आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनीही उडी घेतली आहे. मोरबी दुर्घटनेबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केले असून त्यांनी केंद्रीय तपास यंत्रणांनावरही भडकल्या आहेत.

यावेळी त्या म्हणाल्या की, या दुर्घटनेत 135 लोकांचा जीव गेला आहे, त्यामुळे साऱ्या देशाला या घटनेचे दुःख झाले आहे.

या दुर्घटनेबद्दल मत व्यक्त करताना त्या म्हणाल्या की, मोरबी दुर्घटनेवर राजकारण करता येणार नाही. पण राजकारणापेक्षा लोकांचा जीव मौल्यवान असल्याचे सांगितले.

ही दुर्घटना घडून गेली असली तरी या प्रकरणी सरकारला उत्तर हे द्यावेच लागणार आहे. त्यामुळे मोरबी दुर्घटनेची चौकशी होणे गरजेचे असून सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या न्यायिक समितीद्वारे या घटनेचा तपास करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

लोकांचा जीव महत्वाचा असल्यानेच मी त्यांच्याविषयी दुःख व्यक्त करत आहे. या दुर्घटनेत काही लोकांचा जीव गेला आहे तर काही लोकं अजूनही बेपत्ता आहेत. त्यामुळे या घटनेची न्यायिक समितीद्वारे तपास करण्याची मी मागणी करत  आहे असंही त्या म्हणाल्या.

मोरबी दुर्घटनेविषयी बोलताना त्यांनी ईडी आणि सीबीआयवरही जोरदार टीका केली आहे. या तपास यंत्रणांवर सवाल उपस्थित केले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, गुजरातमधील मोरबी दुर्घटन घडल्यानंतर त्याला जबाबदार असणाऱ्या लोकांची ईडी आणि सीबीआयकडून चौकशी का केली जात नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

मोरबीमधील हा जुलता पूल शंभर वर्षापेक्षा खूप जुना होता. ज्या वेळी या पुलावर दुर्घटना घडली त्यावेळी 135 लोकांचा त्यामध्ये मृत्यू झाला होता. तर अनेक लोकं बेपत्ता झाली आहेत.

तर काहीजण गंभीर जखमी असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. एवढी मोठी दुर्घटना घडूनही या प्रकरणी फक्त 9 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यामुळे याप्रकरणी गंभीर तपास होणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.