नवी दिल्ली | 10 March 2024 : ममता बॅनर्जी यांच्या एका खेळीने राजकीय सारापाटावरील गणितं विस्कटली. इंडिया आघाडीच्या मंचावर काँग्रेस दुय्यम वागणूक देत असल्याचा राग त्यांनी यापूर्वी पण आलापला होता. राहुल गांधी यांच्या न्याय यात्रेवर पण त्यांनी दण आपट केली होती. त्याचवेळी नितीशबाबू यांच्यापूर्वीच ममता आघाडीत बाहेर पडतात की काय असे वाटत होते. सुरुवातीला ट्रेलर दाखविल्यानंतर आता दीदींनी चित्रपट दाखवला. पश्चिम बंगालमधील लोकसभा निवडणुकीतील सर्वच जागांवरील तृणमूल काँग्रेसच्या उमेदवारांची यादी त्यांनी जाहीर केली. त्यामुळे त्यांनी आता भाजपसह इंडिया आघाडीला पण थेट इशारा दिला आहे.
काँग्रेस अंधारातच, इंडिया आघाडीला सुरुंग
इंडिया आघाडीचे पश्चिम बंगालमधील काय होणार, हे सांगायला राजकीय ज्योतिषाची गरज नव्हती. काँग्रेससोबत तृणमूलचा ताळमेळ किती बसेल याविषयी मोठी साशंकता होती. ती अखेर खरी ठरली. बैठका सुरु असताना पण टीएमसीचे अनेक नेते काँग्रेसला थेट विरोध करत होते. दोन्ही पक्षात सामंज्यस नव्हते. त्यामुळे शेवटी ममता बॅनर्जी यांनी एकला चलो रेचा नारा दिला. तसेच संदेशखालीप्रकरणात भाजपने जी रणनीती आखली त्यात दीदी एकट्या पडल्याचे चित्र समोर आले. त्यातूनच आघाडीतील ऐक्याबाबत शंका उठली होती.
42 जागांवर टीएमसी उमेदवार