‘दो दिल मिल रहे है मगर चुपके चुपके… सबको हो रही है खबर चुपके चुपके…’ हिंदी चित्रपटातलं, शाहरुख खानचं हे गाण खूपच लोकप्रिय आहे. लोकांनी, समाजाने कितीही आव्हानं उभी केली तर खर प्रेमी एकमेकांना भेटण्याचा मार्ग शोधून काढतातचं. काहीवेळा अतरंगी उपायही केले जातात, पण प्रेमात सगळंच माफ असतं असं म्हणतात. उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्येही असंच काहीसं घडलं खरं, ज्याची सध्या सगळीकडेच चर्चा सुरी आहे.
मुरादाबादमध्ये एक इसमा त्याच्या प्रेयसीला गुपचूप भेटायला आला खरा पण त्याने जी युक्ती केली ती खूपच अनोखी होती. प्रेमात पडलेल्या त्या तरुणाने बुरखा घातला होता आणि हातात हातमोजे देखील घातले होते. अशा वेषात आल्याने कोणीच आपल्याला ओळखू शकणार नाही असा त्याचा कयास होता, पण दुर्दैवाने त्याची ही युक्ति सफल ठरली नाही आणइ सगळं पितळ उघडं पडलं. त्याच्या चालीवरूनच लोकांनी त्याला ओळखलं.बुरख्यात एक महिला नव्हे तर पुरूष आहे हे लोकांना समजलं आणि मग काय.. धमाल !
चालीने पितळ उघडं पाडलं
हे प्रकरण मुरादाबादच्या भोजपूर पोलीस स्टेशन हद्दीतील पिपलसाना गावात घडलं. रस्त्यावरून जाणाऱ्या पादचाऱ्यांना बुरख्यातील एक महिला वेगाने जाताना दिसली. तिने बरुखा घातला असला तरी तिची महिलेसारखी नव्हे तर एखाद्या पुरषासारखी होती, ते पाहून येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना संशय आला. त्यांनी अखेर त्या स्त्रीला थांबवलं आणि बुरखा काढण्यास सांगितलं. मात्र भेदरलेल्या त्या व्यक्तीने बुरखा काढण्यास टाळाटाळ केली. हळूहळू आजूबाजूला गर्दी जमली आणि मग त्या व्यक्तीचं पितळ उघडं पडलं. बुरख्यातील व्यक्ती एक स्त्री नव्हे तर पुरूषच आहे, हे लोकांना समजलं.
प्रेयसीला भेटण्यासाठी केली होती युक्ति पण..
अखेर आसपासच्या लोकांनी जबरदस्तीने त्याच्या चेहऱ्यावरून बुरखा काढून टाकला आणि त्याला घेरून ची चौकशी करू लागले. तेव्हा त्या रूणाने सर्व सत्य सांगितलं. खरतर तो त्याच्या प्रेयसीला भेटण्यासाठी बुरखा घालून, लपून छपून होता. कोणीच ओळखू नये यासाठी त्याने हा सर्व घाट घातला होता, बुरखा , हातमोजे घालून रूपही बदलले. पण त्याची चाल काही बदलू शकला नाही आणि तिथेच तो पकडला गेला.
आजूबाजूच्या लोकांनी या घटनेचा व्हिडिओ बनवला,तो सध्या सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे. लोकांनी त्या तरुणाकडे त्याचे आधार कार्ड मागितले, मात्र तरुणाने त्याला आधार कार्ड देण्यास नकार दिला. यानंतर लोकांनी पोलिसांना बोलावून त्या तरुणाला त्यांच्या ताब्यात दिले. सध्या पोलीस तरुणाची चौकशी करत आहेत.