मणिपूर : गेल्या काही दिवसांपासून शांत असणारे मणिपूर धगधगते आहे. मणिपूरमधील हिंसाचारानंतर आता तेथील परिस्थिती अजूनही बिघडत असल्याचे दिसून येत आहे. काही आंदोलकांनी बुधवारी बिष्णुपूर जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम मंत्री कोन्थौजम गोविंद दास यांच्या घराची तोडफोड केली आहे. नेत्यांच्या घराची तोडफोड केल्यानंतर आंदोलकांनी दावा केला आहे की, राज्य सरकार इतर समुदायाच्या दहशतवाद्यांपासून संरक्षण करण्यासाठी कोणतीही ठोस पावले उचलत नाही.
यावेळी हेही स्पष्ट करण्यात आले आहे की, मंत्र्यांच्या घराची तोडफोड करणाऱ्या आंदोलकांमध्ये बहुतांश महिलांचाच समावेश होता. मात्र, यावेळी मंत्री आणि त्यांचे कुटुंबीय घराबाहेर असल्याने पुढील अनर्थ टळला होता.
निंगथोखॉंग भागात जमावाने त्यांच्या घरावर हल्ला केला होता. त्यामधील एक गेट, खिडक्या, काही फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे नुकसान केले होते. तर मेईतेई आणि कुकी समुदायांमध्ये राज्यात सुरू असलेल्या हिंसाचाराच्या दरम्यान काही आंदोलकांकडून मंत्र्याच्या घरावर या प्रकारची हल्ला होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
त्यामुळे मणिपूरमध्ये 3 आठवड्यांपूर्वी सुरू झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत 70 जणांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी लष्कर आणि निमलष्करी दल राज्यभरात तैनात करण्यात आले आहेत. तर एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले आहे की, स्थानिक नागरिक सरकारवर नाराज दिसून येत आहेत.
त्यांनी सांगितले की स्थानिक लोक मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग, गोविंद दास आणि इतर भाजप आमदारांवर मात्र मौन पाळत आहेत.तर इतर समुदायातील लोकांना दहशतवाद्यांच्या कृत्यांपासून वाचवण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले जात नाहीत असा आरोप करण्यात आला आहे.
माध्यमांच्या वृत्तानुसार काही दहशतवाद्यांनी बिष्णुपूर जिल्ह्यातील टोरंगलाबी येथे काही ग्रामस्थांच्या घरांना आग लावण्यात आली होती.
त्यानंतर त्या अधिकाऱ्यांनी कर्फ्यू रिलीफ वेळ आणखी कमी केला होता. तर चुरचंदपूरमध्ये काही लोकांची हत्या झाल्याचीगी अफवाही पसरवल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र या अफवांना अधिकृतरित्या कोणत्याही प्रकारचा दुजोरा मिळालेला नाही.