नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. नोटाबंदी आणि आपमधील मनीष सिसोदिया यांना तुरुंगात टाकण्यावरून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.त्यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, देशाचा पंतप्रधान शिक्षित असणे ही काळाची गरज आहे. कारण कमी शिकलेल्या पंतप्रधानांना कोणीही मूर्ख बनवू शकतो असा घणाघाता त्यांनी त्यांच्यावर केला आहे. आपच्या दोन हुशार मंत्र्यांना अटक करण्यात आली आहे.
पहिले आहेत, सत्येंद्र जैन. ज्यांनी दिल्लीची वीज मोफत केली, उपचार, औषधे मोफत दिली आणि मोहल्ला रुग्णालये बांधली. लोकांसाठी काम करणाऱ्या या माणसांना पंतप्रधानांनी त्यांना तुरुंगात टाकले आहे.
तर दुसरे म्हणजे मनीष सिसोदिया ज्यांनी दिल्लीतील गरिबांच्या मुलांना चांगले शिक्षण दिले. ज्यांच्या हाता पुस्तक देण्यात आले त्याही मनीष सिसोदिया यांनाही नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यावर टीका केली.
नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना अरविंद केजरीवाल म्हणाले की, ज्या दिवशी मनीष सिसोदिया यांना तुरुंगात पाठवण्यात आले, त्यादिवशी मला वाटले की देशाच्या पंतप्रधानांनी शिक्षण घेतले पाहिजे.
ते शिक्षित असते तर त्यांना शिक्षणाचे महत्त्व कळले असते. पंतप्रधान देशभक्त असते तर मनीष सिसोदिया कोणत्या पक्षाचे आहेत याचा विचार केला नसता. त्यांचे ज्ञान बघून नरेंद्र मोदी यांनी त्यांना देशाचे शिक्षणमंत्री केले असते असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
नोटाबंदीवरूनही अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. कारण कमी शिकलेल्या माणसाला कोणीही आणि कधीही मूर्ख बनवू शकते.
नोटाबंदी केल्यानंतर भ्रष्टाचार-दहशतवाद संपणार अशा शब्दात ज्यांनी भ्रष्टाचार आणि दहशतवादा मोठी अश्वासनं दिली त्यामुळे भ्रष्टाचार-दहशतवाद संपला आहे का? असा सवालही त्यांनी यावेळी केला.
यावेळी अरविंद केजरीवाल यांनी सांगितले की, सुशिक्षित पंतप्रधानाला अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान आणि विज्ञानाचे ज्ञान असणे गरजेचे आहे. कारण नोटाबंदीमुळे ना भ्रष्टाचार संपला ना दहशतवाद संपला असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.
कोरोना व्हायरस संपवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थाळी वाजवण्याचे आवाहन केले होते. आता थाळी वाजवून देशातील कोरोना गेला का असा सवाल करत त्यांनी त्यांच्या आवाहनची खिल्ली उडवली. म्हणून देशाला शिक्षित पंतप्रधान पाहिजे अशी टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली.