Liquor Death : विषारी दारु पिल्यानं हाहाकार, उत्तर प्रदेशमध्ये आतापर्यंत 84 मृत्यू

| Updated on: Jun 01, 2021 | 6:00 PM

अलीगडमधील करसुआ गाावात विषारी दारु पिल्यानं (Aligarh Poison Liquor) 85 लोकांचे मृत्यू झालेत.

Liquor Death : विषारी दारु पिल्यानं हाहाकार, उत्तर प्रदेशमध्ये आतापर्यंत 84 मृत्यू
Follow us on

लखनौ : उत्तर प्रदेशमधील कायदा सुव्यवस्थेचे कायमच धिंडवडे निघत असतात. आता आणखी एका घटनेने युपीच्या कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचं उघड झालंय. अलीगडमधील करसुआ गाावात विषारी दारु पिल्यानं (Aligarh Poison Liquor) 85 लोकांचे मृत्यू झालेत. या गावच्या सरपंचांनी ऑक्टोबर 2020 मध्येच तक्रार देऊन हा दारू ठेका बंद करण्याची मागणी केली होती. मात्र, उत्पादन शुल्क (Excise Duty) विभागाने दोनवेळा या ठेक्याला क्लिन चिट देत पाठिशी घातलं. अखेर याच ठेक्यावर दारु पिल्यानं 85 लोकांना आपला जीव गमवावा लागलाय (Many death in Aligarh Uttar Pradesh due to poisonous liquor alcohol).

85 जणांचा बळी घेणारा हा दारुठेका अलीगडमधील करसुआ गावात आहे. गावकऱ्यांनी लेखी तक्रार (Written Complaint) देऊनही प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही. करसुआ गावचे सरपंच रितेश उपाध्याय यांनी स्वतः याबाब उत्पादन शुल्क विभागाकडे तक्रारी केली होती (Complaint To Liquor Shop). यानंतर उत्पादन शुल्क विभागाने या ठेक्याला क्लिन चिट दिली. आता या ठेक्यातील दारूने अनेक लोकांचे जीव घेतलेत.

घटनेनंतर प्रशासन जागं, 33 लोकांना अटक

आधी तक्रार देऊनही कारवाई न करणारं प्रशासन इतक्या लोकांच्या मृत्यूनंतर आता खडबडून जागं झालंय. विषारी दारु मृत्यूप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीसह एकूण 33 जणांना अटक केलीय. यात 50-50 हजार रुपयांचं बक्षीस डोक्यावर असलेल्या गुन्हेगारांचाही समावेश आहे.

एसएसपी कलानिधी म्हणाले, “या प्रकरणाच्या तपासासाठी 6 सदस्यीय समिती नियुक्त करण्यात आलीय. ही समिती पुराव्यांच्या आधारे छापेमारी करत आहे. यात अवैध दारु निर्मितीत वापरण्यात येणारं साहित्य जप्त करण्यात आलंय. पोलीस सातत्याने छापेमारी करत आहे. विषारी दारू पिल्यानं आतापर्यंत 84 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. ही घटना होऊन 4 दिवस झालेत. तेव्हापासून दररोज मृतांचा आकडा वाढत आहे. हा आकडाही वाढण्याची शक्यता आहे.

उत्तर प्रदेश सरकारकडून केवळ 25 मृत्यूंचाच दावा

विषारी दारुमुळे अनेकांचा मृत्यू झालाय, तर अनेकजण अद्याप रुग्णालयात गंभीर स्थितीत आहेत. मात्र, सरकारवर आता मृत्यूची आकडेवारी लपवला जात असल्याचा आरोप होतोय. प्रशासनाने आतापर्यंत केवळ 25 मृत्यूची माहिती दिलीय. याशिवाय झालेले मृत्यू संशयास्पद आहेत असून या मृतदेहांच्या शवविच्छेदन अहवालानंतरच सत्य समोर येईल, असा दावा त्यांनी केलाय.

उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांवर अखेर कारवाई

तक्रारीनंतरही संबंधित अवैध दारू ठेक्यावर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर या हत्याकांडानंतर अखेर कारवाई करण्यात आलीय. मृतांची संख्या वाढत असल्याचं दिसताच उत्तर प्रदेशच्या उत्पादन शुल्क आयुक्तांचं निलंबन करण्यात आलंय. याशिवाय 2 वरिष्ठ अधिकाऱ्यांचंही निलंबन झालंय.

हेही वाचा :

सामाजिक कार्यकर्त्यांचा विरोध झुगारुन चंद्रपूरमधील दारु बंदी उठवली, ठाकरे सरकाराचा मोठा निर्णय

‘चंद्रपूरसाठी काळा दिवस, दारूबंदी अयशस्वी की मंत्री-शासन अपयशी?’ पद्मश्री बंग दाम्पत्याचा ठाकरे सरकारला सवाल

पदोन्नतीतील आरक्षणाच्या मुद्द्यावरून लक्ष हटवण्यासाठी सरकारकडून काँग्रेसला दारुबंदीचं गिफ्ट : सुधीर मुनगंटीवार

व्हिडीओ पाहा :

Many death in Aligarh Uttar Pradesh due to poisonous liquor alcohol