एका मराठी पोलीस अधिकाऱ्यांच्या हाती, गुवाहाटीच्या कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी

| Updated on: Nov 02, 2023 | 9:56 PM

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत उभी फूट पाडून आपल्या सोबत 40 बंडखोर आमदारांना घेवून गुवाहाटीला आले, त्यावेळी येथील कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी एका मराठी पोलिस अधिकाऱ्याच्या खांद्यावर होती.

एका मराठी पोलीस अधिकाऱ्यांच्या हाती, गुवाहाटीच्या कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी
IPS DR. DHANJAY GHANWAT
Image Credit source: socialmedia
Follow us on

प्रदीप कापसे, आसाम | 2 नोव्हेंबर 2023 : महाराष्ट्रात शिवसेनेत फूट पाडून 40 बंडखोर आमदारांना सोबत घेऊन शिवसेना नेते एकनाथ शिंदे ज्यावेळी गुवाहाटीत पोहचले त्यावेळी तेथील कायदा – सुव्यवस्था पाहण्याची जबाबदारी एका मराठी पोलिस अधिकाऱ्यावरच होती. मूळचे बारामतीचे असलेल्या सहायक पोलीस महानिरीक्षक डॉ. धनंजय घनवट यांच्या शिरावर आसाम सारख्या राज्याची कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी आहे. त्यांच्याशी टीव्ही 9 मराठी चॅनलचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांनी बातचीत केली.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत उभी फूट पाडून आपल्या सोबत 40 बंडखोर आमदारांना घेवून गुवाहाटीला आले, त्यावेळी येथील कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी एका मराठी पोलिस अधिकाऱ्याच्या खांद्यावर होती. मूळचे बारामतीचे असलेले डॉ. घनंजय घनवट आसाम पोलिस दलात सहायक पोलीस महानिरीक्षक म्हणून कर्तव्य बजावत आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशाला एकसंघ करण्यासाठी आयपीएस कॅडर निर्माण केली होती. भारत ऑल इंडीया सर्व्हीसमधून एकदा कॅडर मिळाले की तेथील मातीतील होऊन आपल्याला सेवा करायला मिळते. गेले 12 वर्षे आपण आसाममध्ये काम करीत असून ही आपली आठवी पोस्टींग असल्याचे घनवट यांनी सांगितले.

आमदारांची सुरक्षा प्रोफेशनली हाताळली

आसामचा इतिहास दंगली आणि बॉम्बस्फोटांचा होता. नव्वदच्या दशकात येथील परिस्थिती अस्थिर होती. परंतू आता अनेक जणांच्या बलिदानानंतर परिस्थिती सुधारली आहे. आसामचे गुवाहाटी हे नॉर्थ इस्टचा गेटवे म्हटले जाते. अंलमी पदार्थाच्या तस्करीचा हा गोल्डन ट्रँगलचा भाग असल्याचे म्हटले जाते. परंतू देशातील सगळ्या पोलिस संघटनामध्ये आसाम पोलिसांनी ड्रग्ज सप्लाय रोखण्यात मोठी भूमिका बजावली आहे. एका मोठ्या राज्याचा मंत्री 40 आमदारांना घेऊन येतो तेव्हा सुरक्षा राखणे आव्हानात्मक जबाबदारी होती. आसाम पोलिसांसाठी हे चॅलेंज अत्यंत प्रोफेशनली हाताळले. हा प्रदेश निसर्ग सौदर्याने नटलेला असल्याने लोकांनी आसामला येऊन तो पहावा असेही घनवट यांनी सांगितले.