कोट्टायम, केरळ : ख्रिश्चन समुदायातील (Christian Community) एका परंपरेवर कोर्टाने बंदी (Ban by Court) घातली आहे. येथील परंपरेनुसार, बहिण-भावातच लग्न (Marriage Between Brother and Sister) लावून देण्यात येते. ही कोणतीही धार्मिक बाब नसल्याचे निकाल देताना कोर्टाने म्हटले आहे. त्यामुळे या प्रथेवर कोट्टायम येथील कोर्टाने बंदी घातली आहे.
हे प्रकरण नात्यातील बहिणीशी लग्नाचे नाही, म्हणजे आतेबहिण, चुलत बहिण, मामे बहिणी, दुरची बहिणी असे नाही तर सख्ख्या बहिण-भावातील लग्नाचे आहे. ही परंपरा या समुदायात सुरु आहे. हा समुदाय अत्यंत अल्प लोकसंख्येचा आहे. ही परंपरा का सुरु आहे, याची कारणे ही आहेत.
केरळमधील हा ख्रिश्चन समुदाय बहिण-भावातील लग्नाचा असा तर्क देतो की, समोरचा डोक्याला हात लावतो. या समुदायाच्या दाव्यानुसार, हा समाज स्वतःला जातीने अत्यंत शुद्ध समजतो.ही शुद्धता टिकविण्यासाठी भावा-बहिणींचा विवाह लावण्याची प्रथा सुरु करण्यात आली आहे.
हा समुदाय कनन्या कॅथलिक समुदाय आहे. इसवी सण 345 मध्ये किनाईच्या व्यापारी थॉमससह मेसोपोटेमिया येथून 72 ज्यू-ख्रिश्चन कुटुंब आले होते. कनन्या कॅथलिक समुदाय हा स्वतःला त्यांचे वंशंज मानतो.
एका हिंदी वृत्तपत्रानुसार, किनाईचा पुढे अपभ्रंश होऊन ते कनन्या झाले. केरळच्या कोट्टायम आणि आजुबाजूच्या जिल्ह्यात हा समुदाय आढळतो. या समुदायाची सध्याची लोकसंख्या 1.67 लाख इतकी आहे. यामध्ये 218 पादरी आणि नन आहेत.
आपल्या जातीची, समुदायाची शुद्धता टिकविण्यासाठी बाहेरील पुरुष वा स्त्रीयांशी हा समुदाय लग्न करु देत नाही. जर कोणी ही परंपरा मोडली तर त्या व्यक्तीला समाजातून बहिष्कृत करण्यात येते. म्हणजे समाजा बाहेर काढण्यात येते.
समाजाबाहेर लग्न करणाऱ्याला सर्व प्रकारचा त्रास देण्यात येतो. त्याचे हक्क हिरविण्यात येतात. त्याला चर्चमध्ये प्रार्थनेसाठी येण्यास बंदी घालण्यात येते. तर स्मशानभूमीत ही त्याचे शेवटचे क्रियाकर्म केल्या जात नाही.
दुसऱ्या समाजात, जातीत, धर्मात लग्न करणाऱ्यांशी हा समुदाय पूर्णपणे नाते तोडतो. तो अशा व्यक्तिंना कुठल्याही कार्यक्रमात सहभागी होण्यास मज्जाव करतो. लग्न कार्य आणि दुःखाच्या प्रसंगातही त्यांना उपस्थितीची परवानगी नसते.
सांथा जोसेफ या महिलेने कोर्टात धाव घेतली होती. त्यानुसार, ती ख्रिश्चन आहे, पण ती कनन्या समुदायाची नाही. तिचा पती मात्र कनन्या समुदायाचा आहे. त्यांच्या विवाहामुळे तिच्या पतीला समाजाबाहेर काढण्यात आले. तिच्या पतीला समुदायाने स्मशानभूमीतही जाण्यापासून रोखले.
या परंपरेला झुगारणाऱ्या लोकांनी आता एक नवीन समितीच गठित केली आहे. कनन्या कॅथलिक नवीकरण समिती या नावाची ही समिती पीडित लोकांसाठी कोर्टात धाव घेत आहे. त्यांना कायदेशीर मदत मिळवून देत आहे.