इंदूरमधून (Indore) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इंदूरमध्ये शुक्रवारी रात्री उशीरा एका तीन मजली इमारतीला भिषण आग (building caught fire) लागली. या आगीत सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. आगीत जखमी झालेल्या व्यक्तींना उपचारासाठी रुग्णालयात (hospital) दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. मात्र शॉक्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. संबंधित बिल्डिंगमधून धुराचे लोट निघत असल्याचे स्थानिक लोकांच्या लक्षात आले, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. आगीने रौद्र रूप धारण केले होते. आग लागल्याचे समजताच स्थानिकांनी घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली. घटनेची माहिती समजताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले, अग्निशमन दलाने मोठ्या प्रयत्नाने आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र तोपर्यंत खूप उशिर झाला होता. या घटनेत सात जणांचा मृत्यू झाला आहे तर आठ जण जखमी झाले आहेत.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की. इंदूरमधील विजय नगर पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात येणाऱ्या स्वर्णबाग परिसरातील एका तीन मजली इमारतीला रात्री उशिरा आग लागली. इमारतीमधून धुराचे लोट निघत असल्याचे स्थानिकांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. मात्र तोपर्यंत आगीने रौद्र रुप धारण केले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी मोठ्या प्रयत्नाने आगीवर नियंत्रण मिळवले, मात्र तोपर्यंत खूप उशिर झाला होता. या दुर्दैवी घटनेत सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर आठ जण जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे.
शुक्रवारी रात्री या इमारतीला आग लागली. या आगीत सात जणांचा मृत्यू झाला आहे, तर आठ जण जखमी झाले आहेत. ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अग्निशमन दलाने आगीवर निंयत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत उशिर झाला होता. आगीने रौद्र रूप धारण केल्याने लोकांना इमारतीबाहेर पडता आले नाही. त्यामुळे सात जणांना आपला प्राण गमवावा लागला.