भारतीय रेल्वेला देशाची लाफलाइन म्हटलं जातं. भारतीय रेल्वेतून रोज सुमारे दोन कोटी लोक प्रवास करतात. 13 हजार पॅसेंजर ट्रेन देशाच्या कानाकोपऱ्याशी जोडल्या गेल्या आहेत. या पॅसेंजर ट्रेन देशातील सुमारे 7 हजाराहून अधिक रेल्वे स्थानकात पोहोचतात. आपल्या प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी रेल्वे आणि रेल्वे मंत्रालयही सातत्याने प्रयत्न करत असतात. रेल्वे स्थानकांच्या सुधारणेपासून नव्या रेल्वे सुरू करण्यापर्यंतची खबरदारी घेतली जाते.
देशात सुमारे सात हजाराहून अधिक रेल्वे स्थानके आहेत. त्यामुळे प्रत्येक रेल्वेस्थानकातून त्या त्या राज्यातील ट्रेन उपलब्ध असतात. पण देशात असंही एक रेल्वे स्थानक आहे की त्या स्थानकातून तुम्ही देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जाण्यासाठी रेल्वे पकडू शकता. देशातील कोणत्याही कानाकोपऱ्यात जाण्यासाठी ट्रेन मिळणारं हे एकमेव स्थानक आहे. त्याची माहिती तुम्हालाही असायलाच हवी.
तुम्हीही देशातील अनेक शहरात प्रवास केला असेल. अनेक स्थानकातून ट्रेनही पकडली असेल. पण देशात असंही एक रेल्वे स्थानक आहे की, त्या स्थानकातून तुम्ही देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जाऊ शकता. नाही माहीत. ते रेल्वे स्थानक म्हणजे मथुरा जंक्शन (Mathura Junction). उत्तरप्रदेशातली मथुरा जंक्शन हे एकमेव स्थानक आहे. या ठिकाणाहून देशाच्या कोणत्याही भागात जाण्यासाठी तुम्ही ट्रेन पकडू शकता.
दिल्लीच्या जवळच मथुरा स्टेशन आहे. सर्वाधिक गर्दी असलेलं आणि नेहमी वर्दळ असलेलं हे देशातील महत्त्वाचं रेल्वे स्थानक आहे. मथुरा रेल्वे स्थानकातून तुम्ही 24 तास देशातील कोणत्याही स्थानकातून ट्रेन पकडू शकता. तुम्हाला काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि मुंबईपासून बंगालपर्यंत कुठेही जाण्यासाठी या रेल्वेस्थानकातून रेल्वे मिळेल.
सात वेगवेगळे रूट
उत्तर मध्य रेल्वेच्या अंतर्गत येणारं हे मथुरा जंक्शन देशातील सर्वात मोठं रेल्वे जंक्शन आहे. या ठिकाणाहून सात वेगवेगळ्या रूटसाठी ट्रेन सुटते.
197 ट्रेनचं स्टॉप
मथुरा जंक्शनवर 10 प्लॅटफॉर्म आहेत. या ठिकाणी 197 ट्रेन थांबतात. राजधानी, शताब्दी, दुरंतो सारख्या सुपरफास्ट ट्रेनचा यात समावेश आहे. दिल्ली, केरळ, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, ओडिशा, राजस्थान, छत्तीसगड, मध्यप्रदेश आणि बिहारसहीत देशातील विविध भागातून येणाऱ्या ट्रेन या ठिकाणी थांबतात.
24 तास वर्दळ
मथुरा जंक्शन 24 तास वर्दळ असणारं रेल्वे स्थानक आहे. या ठिकाणाहून देशातील वेगवेगळ्या भागात 13 ट्रेन जातात.
मथुरा जंक्शनमध्ये इतकं खास काय?
चांगली कनेक्टिव्हिटी – मथुरा जंक्शन देशातील प्रमुख शहरांना जोडलेलं आहे.
24 तास ट्रेन : या ठिकाणाहून 24 तास ट्रेन उपलब्ध आहे.
सर्वाधिक प्लॅटफार्म : मथुरा जंक्शनवर 10 प्लॅटफॉर्म असल्याने या ठिकाणाहून सर्वाधिक ट्रेन सुटतात.
विभिन्न प्रकारच्या ट्रेन : या ठिकाणाहून राजधानी, शताब्दी, दुरंतो आदी विविध प्रकारच्या ट्रेन धावतात.