नवी दिल्लीः वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी भारताताली लाखो विद्यार्थी दरवर्षी मोठ्या संख्येने चीनमध्ये जात असतात. चीनसह जगातील विविध देशांतून वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भारतात सराव करण्यासाठी परीक्षा द्यावी लागते. त्यानंतरच त्यांना भारतात वैद्यकीय प्रॅक्टिस करण्याचा परवाना मिळत असतो. मात्र, सध्याच्या परिस्थितीमुळे चीनमध्ये एमबीबीएससाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. कारण आता भारतात सराव करण्यासाठी येथील पात्रतेचे निकष पूर्ण करावे लागणार आहेत.
चीनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आता नुकतेच भारतीय दूतावासाने एक निवेदन जाहीर केले आहे. त्यामुळे सध्या चीनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या पात्रता निकषांबाबत भारतीय विद्यार्थ्यांकडून आणि त्यांच्या पालकांकडून प्रश्न विचारले जात आहेत.
नॅशनल मेडिकल कमिशन (NMC) द्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षेत बसण्यासाठी पात्रता निकष काय आहेत, अशी विचारणाही दूतावासाकडे केली जात आहे.
या संदर्भात चीनमधील भारतीय दूतावासाने म्हटले आहे की, या संदर्भात, विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना NMC द्वारे 18 नोव्हेंबर 2021 रोजी अधिसूचना काढून त्यावेळी सूचना देण्यात आल्या आहेत.
क्लॉज 4(b) स्पष्टपणे नमूद करते की परदेशी वैद्यकीय विद्यार्थ्यांनी संबंधितांकडे नोंदणी करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
भारतीय दूतावासाकडून ज्या सूचना देण्यात आल्या आहेत, त्यामध्य स्पष्टपणे म्हटले आहे की, विद्यार्थ्याना ज्या ठिकाणी वैद्यकशास्राची पदवी दिली जाते.
त्या ठिकाणी त्यांना वैद्यकीय सरावासाठी परवाना मिळायला पाहिजे. मात्र तो वैद्यकीय परवाना त्या देशातील नागरिकाला दिलेल्या परवान्याशी समांतर असणे गरजेचा आहे असं म्हटलं आहे.
खरे तर परदेशातून येणाऱ्या डॉक्टरांना भारतात वैद्यकीय सराव करण्यासासाठी FMGE परीक्षा उत्तीर्ण करावी लागते असंही स्पष्ट करण्यात आले आहे.
भारतीय दूतावासाने संबंधित चिनी अधिकारी आणि वैद्यकीय महाविद्यालयांना चीनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी येणारे भारतीय विद्यार्थी शिक्षित, प्रशिक्षित आणि कामासाठी तयार आहेत, जेणेकरून ते NMC च्या सर्व पात्रता निकषांची पूर्तता करतील याची खात्री करण्यास सांगितल्याचे त्यांनी म्हटले आहे.