‘या’ देवस्थानाला मिळाल्या 10 इलेक्ट्रिक बस; भाविकांसाठी पर्यावरण पूरक वाहतुकीची सोय

| Updated on: Mar 27, 2023 | 4:24 PM

पर्यावरणाच्यादृष्टीने या ई-बस देण्यात आल्या असल्याने आता पर्यावरणाविषयी संवेधनशीलपणे विचारही केला जात असल्याने तिरुपती ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेडचे आणि तिरुपती देवस्थान समितीचेही आभार मानण्यात आले आहेत.

या देवस्थानाला मिळाल्या 10 इलेक्ट्रिक बस; भाविकांसाठी पर्यावरण पूरक वाहतुकीची सोय
Follow us on

तिरुपती :  सध्या पर्यावरणविषयक जनजागृती आणि पर्यावरणासाठी केले जाणाऱ्या प्रयत्नासाठी खूप मोठे प्रयत्न केले जात आहे. सामाजिक संस्था देवस्थान समिती,महाविद्यालये, विद्यापीठातून सध्या नवनवे प्रयोग राबवले जात आहेत. त्यामुळे तर काही शहरातील महानगरपालिकांमधून पर्यावरणपूरक अशा गोष्टींसाठीही प्रयत्न केले जात आहेत. त्याच धर्तीवर आता तिरुपती देवस्थानसाठी एमईआयएल ग्रुपच्या माध्यमातून एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला आहे.

तिरुपतीला दक्षिणा देण्याच्या प्रथेच्या अनेक कहाण्या सुरसपणे ऐकवल्या जात असतात. पण आता तिरूपतीच्या देवाला चक्क इलेक्ट्रिक बसेस भेट म्हणून मिळाल्या आहेत.

मेघा इंजिनीअरींग आणि इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड अर्थात एमईआयएल या कंपनीची उपकंपनी ऑलेक्ट्रा ग्रिनटेक लिमिटेडने तिरुमाला तिरुपती देवस्थानाला (TTD) ला 10 इलेक्ट्रिक बसेस भेट स्वरुपात देण्यात आल्या आहेत.भाविकांसाठी हा उपक्रम राबवण्यात आल्याने भाविकांतूनही समाधान व्यक्त केले जात आहे.

तिरुमला घाट हा पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील प्रदेश आहे. डिझेल इंधन न वापरता इलेक्ट्रिक बसेसचा वापर केल्याने कार्बन उत्सर्जन घट होण्यास तसेच इंधनाच्या खर्चात कपात होण्यास मदत होणार आहे. टीटीडीने या देणगी बद्दल एमईआयएलचे आभार मानले आहेत.

ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक के.व्ही. प्रदीप याप्रसंगी तिरुमला येथे उपस्थित होते. स्वच्छ आणि पर्यावरणपूरक 9-मीटर- प्रकारातल्या या 10 ई-बस डोंगराच्या वरच्या भागातल्या मंदिर परिसरात भाविकांची वाहतूक करणार आहेत. या ई-बससाठी चार्जर स्टेशन्स उभारले असल्याचेही सांगण्यात आले आहे.

पर्यावरणाच्यादृष्टीने या ई-बस देण्यात आल्या असल्याने आता पर्यावरणाविषयी संवेधनशीलपणे विचारही केला जात असल्याने तिरुपती ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेडचे आणि तिरुपती देवस्थान समितीचेही आभार मानण्यात आले आहेत.