चेन्नई : देशातील आघाडीची कंपनी मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने ( Megha Engineering & Infrastructures Limited) कोरोनाविरुद्धच्या लढाईत मोठा वाटा उचलला आहे. मेघा इंजिनिअरिंगने तामिळनाडूमध्ये 3 हजारपेक्षा जास्त बेडचं कोव्हिड रुग्णालय उभारलं आहे. यापूर्वीही MEILने ऑक्सिजन तुटवड्याचा प्रश्न सोडवण्यासाठी, थेट थायलंडवरुन थायलंडमधून अद्ययावत ऑक्सिजन क्रायोजेनिक टँकर मागवले. त्यामुळे तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि ओडिशा अशा 3 राज्यांमधील रुग्णालयांना वेगाने ऑक्सिजन पुरवठा करणं शक्य झालं. (MEIL Establishes more than 3000 beds covid center in Tamilnadu)
मेघा इंजिनिअरिंगचा पसारा जगभरात 20 देशांमध्ये पसरला आहे. हैदराबादस्थित असलेल्या या कंपनीने केवळ तेलंगाना, आंध्र प्रदेशातच नाही तर आता तामिळनाडूमध्येही मोठी मदत केली आहे. कंपनी आता तामिळनाडूत 3 हजारपेक्षा जास्त बेडचं कोव्हिड रुग्णालय उभारत आहे. त्यापैकी 660 बेड कार्यरत झाले आहेत. याचा फायदा तामिळनाडूतील प्रमुख शहर चेन्नई, मदुरैसह परिसरातील तालुक्यांना होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे केवळ 72 तासात 500 ऑक्सिजन बेड उभा करुन रुग्णसेवा सुरु केली आहे.
तामिळनाडूत उभं राहात असलेल्या या रुग्णालयात राज्य सरकारकडून मोफत उपचार केले जाणार आहेत. यासाठी तामिळनाडू सरकारसह क्रेडाय जि. रियल्टर्स यासारख्या कंपन्यांनीही सहभाग घेतला. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टालिन यांच्या देखरेखीखाली हे रुग्णालय उभं राहत आहे.
MEIL कडून तामिळनाडूची राजधानी चेन्नईत विविध रुग्णालयात 1070 ऑक्सिजन बेडची व्यवस्था केली जात आहे. यापैकी 600 बेडची व्यवस्था झाली आहे. तर भविष्यात 3000 ऑक्सिजन बेडची निर्मिती MEIL कडून केली जाणार आहे.
दरम्यान, कोरोनाविरुद्धच्या या लढाईत MEIL ला क्रेडाय, जि रियल्टर्स यांची साथ मिळाली. या तिन्ही कंपन्यांनी मधुरैच्या सरकारी रुग्णालयात 72 तासात 200 ऑक्सिजन बेडची निर्मिती केली. 21 मे रोजी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टालिन यांनी त्याचं उद्घाटनही केलं. आणखी 300 बेडची निर्मिती केली जात आहे.
देशातील आघाडीची कंपनी मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने रुग्णालयांमधील ऑक्सिजनची तुटवड्याचा प्रश्न सोडमवण्यासाठी मोठं पाऊल उचललं आहे. यानुसार कंपनीने थेट वैद्यकीय वापरासाठीच्या लिक्विड ऑक्सिजनचा मोफत पुरवठा करण्यासाठी थायलंडमधून अद्ययावत ऑक्सिजन क्रायोजेनिक टँकर मागवले आहेत (Cryogenic tanks from Bangkok Thailand). यामुळे तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि ओडिशा अशा 3 राज्यांमधील रुग्णालयांना वेगाने ऑक्सिजन पुरवठा करणं शक्य होणार आहे.
Headline | 1 PM | पुढील 15 दिवसात परिस्थिती नियंत्रणात येईल : विजय वडेट्टीवारhttps://t.co/7e7yeE1fsU #Headline | #Mumbai
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 27, 2021
संबंधित बातम्या :
ऑक्सिजन पुरवठ्यासाठी MEIL मैदानात, ‘या’ राज्यांना मोफत ऑक्सिजन पुरवणार
MEIL Establishes more than 3000 beds covid center in Tamilnadu