नवी दिल्लीः सध्या वेगवेगळ्या राज्यात निवडणुकांचा जोरदार वारे वाहू लागले आहे. त्यामुळे निवडणुकी संदर्भात अनेक नवनव्या घटना घडू लागल्या आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीका केली जात असतानाच मेघालयात मात्र एक धक्कादायक घटना घडली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा प्रचारात सहभागी झाल्या असल्याने त्यांना आता निवडणूक आयोगाने कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
सत्ताधारी नॅशनल पीपल्स पार्टी (NPP) उमेदवाराच्या प्रचारामध्ये मेघालय राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा फिडेलिया तोई यांनी नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
त्यांचा सहभागी झाल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. मुख्य निवडणूक अधिकारी एफआर खारकोंगोर यांनी सांगितले की, जोवई विधानसभा मतदारसंघामध्ये प्रचार चालू असताना तेथील प्रचारामध्ये फिडेलिया तोई सहभागी झाल्याने त्यांना रिटर्निंग ऑफिसरने तोई यांना कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांना दोन दिवसांत त्याचे स्पष्टीकरण मागितले आहे.
भारतीय दंड संहितेच्या कलम 21 नुसार, महिला आयोगाच्या अध्यक्षा या विशिष्ट पदावर असल्यामुळे आणि शासनाच्या कोणत्याही कर्मचाऱ्याला कोणत्याही राजकीय पक्षाशी किंवा संघटनेशी संबंधित कार्य करण्यावर प्रतिबंध करण्यात आले आहे.
या संदर्भातील एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये तोई हे जोवई येथील एनपीपी उमेदवार, वेलादमिकी शैला यांच्यासोबत गेल्या आठवड्यात उमेदवारी अर्ज दाखल करताना त्या दिवशी प्रचार रॅलीत दिसून आल्या होत्या.
राज्य महिला आयोगाच्या प्रमुखांना दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल तुमच्यावर कारवाई का करू नये असा सवाल करण्यात आला आहे.
त्याचबरोबर या संदर्भात त्यांना कारण दाखवा अशी नोटीसही देण्यात आली आहे. तर निवडणूक अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, सोमवारी पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, तुमच्या राजकीय प्रचारसभेत सहभागी झाल्यामुळे आणि तुम्ही विशिष्ट उमेदवाराची बाजू घेत असल्याचा संशय आला असून एखाद्या लोकसेवाकडून तटस्थतावृत्तीला हे मारक असल्याचे म्हणत त्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.