जम्मू काश्मीरः देशाचे गृहमंत्री अमित शहा (Home Minister Amit Shah) नुकताच जम्मू काश्मीर (Jammu Kashmir) दौऱ्यावरुन दिल्लीत परतले आहेत. ते पोहचतात न पोहचताच जम्मू काश्मिरच्या मेहबुबा मुफ्तींनी त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. त्या म्हणाल्या की, अमित शहा नुकतेच जम्मू-काश्मीरमध्ये आले होते. तसेच जम्मू-काश्मीरमधून कलम 370 ही हटवण्यात आले आहे. त्यामुळे येथे आता ते हिंदू मुख्यमंत्रीपदावर विराजमान होणार असल्याचा टोला त्यांनी शहांना लगावला.
याबाबत मी त्यांना एक सवाल उपस्थित करु इच्छिते की, अमित शहांनी जम्मूतील एकाद्या माणसाला लेफ्टनंट गव्हर्नरपदी का बसवले नाही.? त्यांनी यूपी, बिहारमधूनच का आयात केली असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
गृहमंत्री अमित शहा दिल्लीत गेल्यानंतर त्यांनी जम्मू काश्मीरमध्ये घेतलेल्या सभेत दिलेली अश्वासनं आणि केलेली वक्तव्यावरुन मुफ्ती यांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवला आहे.
मेहबुबा मुफ्ती बोलताना म्हणाल्या की, आमच्या पक्षासाठी जम्मूमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे आभार मानते. पीडीपीमध्ये सामील होऊन जम्मूमध्ये काम करणे सोपी गोष्टी नाही.
कारण काही शक्तींनी आमच्या प्रतिमेला कलूषित केले आहे, मात्र माझं सगळं बालपण येथं जम्मूत गेलं असल्याचंही त्यांनी सांगितले.
यावेळी जम्मू काश्मीरमधील लोकांची अवस्था सांगत त्या म्हणाल्या की मला येथील लोकांची खूप वाईट वाटते. कारण त्यांना कित्येक दिवसांपासून अनेक संकटांचा सामना करावा लागतो. मोदींच्या राजकारणाविषयी त्यांनी बोलताना आपल्या वडिलांची आठवण सांगितली.
त्या म्हणाल्या की, जम्मूतील लोकांचा फायदा व्हावा, त्यांना सुखानं, आनंदानी जगता यावे म्हणूनच फक्त माझ्या वडिलांनी मोदींबरोबर हातमिळवणी केली होती, मात्र त्यानंतर काय झालं ते तुम्ही सगळ्यानी पाहिलं आहे असंही त्यांनी सांगितले.
माजी मुख्यमंत्री मुफ्ती म्हणाल्या की, नुकतेच अमित शहा जम्मू-काश्मीरचा दौरा करुन गेले आहेत. येथे त्यांनी जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्यात आले असल्याचे सांगितले.
त्यामुळे आता मग येथे हिंदू मुख्यमंत्री होणार आहे का असा सवालही त्यांनी उपस्थित केला. लेफ्टनंट गव्हर्न पदावर नियुक्ती केलेल्या व्यक्तीबद्दलही सवाल उपस्थित करुन महत्वाच्या पदावर तुम्ही बाहेरुन व्यक्ती का आणता असा सवालही त्यांनी उपस्थित केला.