नवी दिल्ली : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्यानंतर रेल्वे मंत्रालयानं अजून एक निर्णय घेतला आहे. रेल्वे मंत्रालयानं विभागीय रेल्वेला कोविड संबंधित प्रोटोकॉलसह स्थानिक स्थिती लक्षात घेऊन स्थानकांवरील सेवानिवृत्त खोल्या पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेण्यास परवानगी दिली आहे. दरम्यान, रेल्वे बोर्डाने यापूर्वीच सेवानिवृत्त खोल्या, रेल्वे यात्री निवास आणि IRCTC द्वारे चालवले जाणारे हॉटेल्स पुन्हा सुरु करण्यास परवानगी दिली आहे.(Ministry of Railway permission to reopening of retiring rooms at Stations)
सध्यस्थितीत आवश्यकतेनुसार आणि टप्प्याटप्प्याने विविध विशेष एक्सप्रेस / प्रवासी गाड्यांची सेवा सुरु करण्यात आल्या आहेत. प्रवाशांच्या सोयीचा विचार करुन रेल्वेनं सरकारने घालून दिलेल्या नियमावलीच्या पूर्ततेनुसार स्थानकांवर सेवानिवृत्त खोल्या सुरु करण्याचं ठरवलं आहे. कोरोनाचा प्रवास रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर रेल्वे मंत्रालयाकडून ही सेवा बंद करण्यात आली होती. पण आता पुन्हा ती सुरु करण्याचा निर्णय रेल्वेनं घेतला आहे. तसा आदेश रेल्वे मंत्रालयानं विभागीय रेल्वेला दिला आहे.
Ministry of Railways accords permission to Zonal Railways to decide on reopening of retiring rooms at Stations.https://t.co/IYhcFKemUw pic.twitter.com/Zo4L2KOArS
— Ministry of Railways (@RailMinIndia) March 3, 2021
मध्य रेल्वेनं प्लॅटफॉर्मवर होणारी गर्दी टाळण्यासाठी आता मुंबई मेट्रोपोलिटन रिजन म्हणजे MMR रिजनमधील प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट तब्बल 5 पट वाढवलं आहे. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता उन्हाळ्यात गर्दी रोखण्यासाठी मध्य रेल्वेनं हे पाऊल उचललं आहे. मध्य रेल्वेनं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण, पनवेल आणि भिवंडी रोड स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट आता 10 रुपयांवरुन 50 रुपये केली आहे.
यापूर्वी मार्च 2020 मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारतीय रेल्वेनं प्लॅटफॉर्म तिकीट वाढवण्याचा निर्णय घेतला होता. मध्य रेल्वेनं मुंबई, पुणे, भुसावळ, आणि सोलापूर डिव्हिजनमध्ये प्लॅटफॉर्म तिकीत 10 रुपयांवरुन 50 रुपये केलं होतं.
मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिलेल्या माहितीनुसार, उन्हाळ्यात रेल्वे स्थानकांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकीटाचे दर 50 रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेचा हा निर्णय गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी घेण्यात आला आहे. रेल्वेने निश्चित केलेले नवे दर 24 फेब्रुवारीपासून लागू करण्यात आले आहेत. हे दर 15 जूनपर्यंत लागू असणार आहेत. उन्हाळ्यात अनेक लोक सुट्ट्यांसाठी जात असतात. तसंच यात्रांसाठी जाणाऱ्या प्रवाशांमुळे रेल्वे स्थानकांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होते. ही गर्दी टाळण्यासाठी रेल्वेकडून प्लॅटफॉर्म तिकीटाचे दर वाढवण्यात आले आहेत.
संबंधित बातम्या :
पुढच्या 5 दिवसांत रेल्वे प्रवाशांसाठी Good News, तिकिटांबाबत मोठी घोषणा
Ministry of Railway permission to reopening of retiring rooms at Stations