नवी दिल्ली : दिल्लीच्या जंतरमंतरवर महिला कुस्तीपटू सध्या आंदोलन छेडत आहेत. या आंदोलनात अल्पवयीन महिला कुस्तीपटूने ब्रिजभूषण सिंग यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. मात्र त्या अल्पवयीन महिला कुस्तीपटूने पतियाळा हाऊस कोर्टातून रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे प्रमुख ब्रिजभूषण सिंग यांच्या विरोधात केलेली तक्रार मागे घेतल्याचे सांगण्यात येत आहे. अल्पवयीन कुस्तीपटूने 2 जून रोजी आपली तक्रार मागे घेतल्याचे सांगण्यात येत आहे. या कुस्तीपटूने दिल्ली पोलिसांत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात पॉक्सो कायद्याअंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्वत:ला अल्पवयीन असं सांगणारी महिला कुस्तीपटूने आता आपल्या वक्तव्याबाबत माघार घेतली आहे. दिल्ली पोलिसांकडून पटियाला हाऊस कोर्टात कुस्तीपटूचा जबाब नोंदवण्यात आला होता.
तसेच दोन दिवसांपूर्वी पटियाला हाऊस कोर्टातील जबाब मागेही घेण्यात आलेा होता. मात्र, अद्याप या संदर्भात अल्पवयीन व्यक्तीकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आले नसल्याचेही सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू बजरंग पुनियाने आज एक मोठी घोषणा केली आहे.
जम्मू आणि काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक आणि आरएलडी प्रमुख जयंत चौधरी यांच्याकडूनही आता महापंचायतीचे आयोजन केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
बजरंग पुनियाने स्पष्ट केले आहे की, येत्या 3-4 दिवसांत कुस्तीपटूंची महापंचायत बोलावण्यात येणार आहे. तसेच आम्ही महापंचायतही बोलवणार असून त्यावेळी अनेक खेळाडूही एकत्र येणार असल्याचेही त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
पुनिया यांच्या मते त्यांना पंचायतीच्या माध्यमातून सर्वांना एकत्र आणायचे आहे. त्याचबरोबर हा लढा कोणत्याही विशिष्ट जातीसाठी नसून खेळाडूंच्या सन्मानासाठी असल्याचेही त्यांना यावेळी म्हटले आहे.