नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान (India Vs Pakistan) यांच्याबाबतची एक मोठी बातमी हाती येते आहेत. शुक्रवारी भारतानं पाकिस्तानात चुकीनं मिसाईन (Indian Missile) डागलं गेल्याची वृत्त स्वीकरालं आहे. भारत सरकारनं याबाबत खेदही व्यक्त केला आहे. सुरक्षा मंत्रालयानं शुक्रवारी याबाबत अधिक माहिती जारी केली आहे. 9 मार्च 2022 वेळी तांत्रिक बिघाडामुळे आकस्मित मिसाईल डागली गेली. भारतानं याची गंभीर दखल घेत तातडीनं उच्च स्तरीय न्यायालयीन चौकशीचे (Court Inquiry) आदेश जारी केले आहेत. पाकिस्ताननं गुरुवारी भारताकडून मिसाईल डागण्यात आल्याचा दावा केला होता. पाकिस्तानाची पंजाब प्रांतात हे मिसाईल डागण्यात आलं होतं. पासिक्तानी सैन्याचे प्रवक्ते मेजन जनरल बाबर इफ्तिखार यांनी याबाबतचा दावा केला होता. भारताकडून झालेल्या तांत्रिक चुकीचा फायदा घ्यायचा पाकिस्तानच्या इशाद्यावर संरक्षण मंत्रालयाने स्पष्टीकरण देऊन पाणी फिरवले आहे. मात्र पाकिस्तानकडून सुरूवातील या घटनेचे भाडवल करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला गेला.
एएनआय वृत्तसंस्थेचे ट्विट
It is learnt that the missile landed in an area of Pakistan. While the incident is deeply regrettable, it is also a matter of relief that there has been no loss of life due to the accident: Ministry of Defence
— ANI (@ANI) March 11, 2022
पाकिस्तानकडून जारी करण्यात आलेला व्हिडिओ
मिसाईल कुठे पडले, कसे पडले, याबाबत एक व्हिडिओ पाकीस्तानकडून जारी करण्यात आलाय. ट्विट केलेल्या व्हिडिओत त्यांनी त्यांची बाजू मांडली आहे.
DG ISPR Press Conference – 10 March 2022 https://t.co/W5HTbFll3V
— DG ISPR (@OfficialDGISPR) March 10, 2022
नेमका घटनाक्रम काय?
सुरक्षा मंत्रालयानं काय म्हटलंय?
पाकिस्तानच्या हद्दीत मिसाईल पडल्याच माहिती समोर आली आहे. ही अत्यंत दुःखद घटना आहे. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, असं सुरक्षत्रा मंत्रालयानं म्हटलंय. पाकिस्ताननं गुरुवारी भारताकडून मिसाईल डागण्यात आल्याचा दावा केला होता. पाकिस्तानाची पंजाब प्रांतात हे मिसाईल डागण्यात आलं होतं. पासिक्तानी सैन्याचे प्रवक्ते मेजन जनरल बाबर इफ्तिखार यांनी याबाबतचा दावा केला होता. नऊ मार्च रोजी संध्याकाळी सहा वाजून 43 मिनिटांनी एक वेगवान वस्तू भारतीय हवाई क्षेत्रातून झेपावत आली. त्यानंतर मार्ग भटकून ही पाकिस्तानातील हद्दीत घुसली आणि कोसळली, असं मेजर जनरल बाबर इफ्तिखार यांनी म्हटलंय.
मिसाईलमुळे टेन्शनचा महोल
जगात आधीच रशिया आणि युक्रेनचे युद्ध सुरू असल्याने टेन्शनचा माहोल आहे. त्यात ही घटना समोर आल्यामुळे या घटनेचा फायदा घेण्याचा प्रयत्न पाकिस्तान करत आहे. दोन्ही देशातील संबंध बिघडण्यास भारत कसा जबाबदार आहे हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न पालिस्तानकडून सुरू आहे. मात्र भारताच्या संरक्षण मंत्रालयाने वेळीच याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
5 पैकी 4 राज्यात मोदींची हवा! आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विजयी रॅली गुजरातमध्ये