मुंबई : झारखंडमधील बडकागांव विधानसभा मतदारसंघाच्या आमदार अंबा प्रसाद यांनी आज थेट घोड्यावरुन विधानसभा परिसरात रॉयल एन्ट्री केली. निमित्त होतं जागतिक महिला दिन. महाराष्ट्राप्रमाणेच झारखंड विधीमंडळाचंही अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. त्यावेळी आमदार अंबा प्रसाद यांनी थेट घोड्यावर बसून विधानसभा परिसरात प्रवेश केला. महिला दिनानिमित्त अंबा प्रसाद यांनी ही एण्ट्री दिवसभर चर्चेचा विषय ठरली.(Amba Prasad’s entry on horseback in Jharkhand Assembly constituency)
आमदार अंबा प्रसाद या झारखंडमधील माजी मंत्री योगेंद्र साव यांच्या कन्या आहेत. आमदार झाल्यानंतर अंबा या विविध कारणांमुळे कायम चर्चेत असतात. यापूर्वीही त्यांनी विधानसभा परिसरात सायकल चालवत प्रवेश केला होता. अंबा प्रसाद यांनी महिला दिनी विधानसभा परिसरात फक्त घोड्यावरुन प्रवेशच केला नाही. तर त्यांनी महिलांसाठी एक खास भेटही दिली आहे.
अंबा फाऊंडेशनच्या माध्यमातून त्यांनी काम सुरु केलं आहे. त्याचीच माहिती त्यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. “जागतिक महिला दिनानिमित्त समस्त महिलांना शुभेच्छा. या प्रसंगी अंबा फाऊंडेशनच्या पहिल्या प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली आहे. त्यात 115 गरीब विधवा महिलांना स्थानिक रोजगार आणि 9 हजार रुपये प्रति महिना सुनिश्चित करण्यात आला आहे. कालांतराने यातून युवा, महिला आणि स्थानिक नागरिकांना जोडलं जाणार आहे”, असं ट्वीट अंबा प्रसाद यांनी केलं आहे.
अंतर्राष्ट्रीय महिला दिवस के अवसर पर समस्त महिलाओं का सह्रदय अभिनंदन।
इस अवसर पर अंबा फाउंडेशन के पहले प्रोजेक्ट की शुरुआत 115 गरीब विधवा महिलाओं को स्थानीय रोजगार व 9000 प्रति माह रुपया सुनिश्चित करके की गई। कालांतर में इससे अन्य युवाओं, महिलाओं, स्थानीय लोगों को जोड़ा जाएगा। pic.twitter.com/eypBiwxQEa
— Amba Prasad (@AmbaPrasadINC) March 8, 2021
जागतिक महिला दिनानिमित्ताने आज अधिवेशनाच्या प्रवेशद्वारावर महिला आमदार एकवटल्या. हास्यविनोद करत या महिला आमदारांनी एकत्रित सेल्फीही घेतला. सर्वपक्षीय महिला आमदारांनी एकत्र येऊन एकमेकांना महिला दिनानिमित्ताने शुभेच्छा देण्याचा हा प्रसंग सुखद असाच होता.
जागतिक महिला दिन असल्याने आज सर्व पक्षीय महिला आमदारांनी एकत्रित येऊन विधानभवनाच्या गेटवर सेल्फी घेतला. रायगडच्या पालकमंत्री, आमदार विद्या ठाकूर, श्वेता महाले, मनिषा चौधरी, माधुरी मिसाळ, भारती लव्हेकर, मुक्ता टिळक, देवयांनी फरांदे, सीमा हिरे, नमिता मुदंडा आणि मोनिका राजळे आदी महिला आमदारांनी एकत्रित येऊन सेल्फी घेत आजचा दिवस संस्मरणीय केला. एरव्ही विधानसभेत विविध मुद्दयांवर अभ्यासू आणि आक्रमकपणे भाषण करणाऱ्या या महिला आमदार आज हास्यविनोदात रमताना दिसल्या.
इतर बातम्या :
Amba Prasad’s entry on horseback in Jharkhand Assembly constituency