नवी दिल्ली : दिल्लीतील छत्रसाल स्टेडियममध्ये झालेल्या हत्याकांडाच्या तपासाला गती मिळाली आहे. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेला घटनेचे मोबाईल क्लिप आणि सीसीटिव्ही फुटेज हाती लागले असून पैलवान सुशील कुमार आणि अजय बक्करवालचे साथीदार पोलिसांच्या रडारवर आले आहेत. या साथीदारांनी सुशील कुमार आणि अजयला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मदत केली आहे. या संशयितांमध्ये एका महिला क्रीडा खेळाडूचाही समावेश आहे. पोलिसांनी आरोपी सुशील कुमार आणि अजयला अटक केल्यानंतर या संशयित असलेल्या महिला खेळाडूची स्कूटी पोलिसांनी आरोपींकडून हस्तगत केली आहे. दोन्ही आरोपींना रविवारी सकाळी दिल्लीच्या मुंडका भागात दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाच्या पथकाने अटक केली. (Mobile clips and CCTV footage of the chhatrasal murder in the hands of the police)
तपास पथकाशी संबंधित दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अद्याप लिखित अहवाल आला नसला तरी फॉरेन्सिक सायन्स तज्ज्ञांनी घटनेच्या वेळी घटनास्थळावरून जप्त केलेली मोबाईल क्लिप व सीसीटीव्ही फुटेज बरोबर असल्याचे संकेत दिले आहेत. फुटेजमध्ये कोणत्याही प्रकारची छेडछाड झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सीलबंद अहवालही दोन-तीन दिवसांत दिल्ली पोलिस गुन्हे शाखेकडे प्रदान करेल. ही घटना हत्येसारख्या गंभीर गुन्ह्याशी संबंधित असल्याने कोणत्याही पोलिस ठाण्यातील पोलिसांऐवजी हा तपास दिल्ली पोलिसांची गुन्हे शाखाच करीत आहे. त्यामुळे जोपर्यंत काही ठोस हाती लागत नाही तोपर्यंत दिल्ली पोलिस अधिकारीही यावर बोलणे टाळत आहेत. तसेच दिल्ली पोलिस अधिकाऱ्यांनी मौन धारण करण्याचे मुख्य कारण म्हणजे ही घटना समान्य घटनेप्रमाणे नाही. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी हा देशाचा ऑलिम्पियन कुस्तीपटू आहे.
पथकाने केलेला तपास आणि न्यायालयात सादर केलेल्या अहवालात काही फरक जाणवला तर दिल्ली पोलिस उत्तर देऊ शकणार नाहीत. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेचे उपायुक्त (डीसीपी) भीष्म सिंग आणि त्यांच्या पथकांमार्फत करण्यात येत आहे. सुशील कुमार आणि अजय बक्करवाला यांना फरार असताना आश्रय देणाऱ्या किंवा अनवधानाने मदत करणार्यांचा तपासात समावेश करण्याचा विचार आता गुन्हे शाखेचे पथक करीत असल्याचे समजते.
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटकेदरम्यान आरोपी ज्या स्कूटीवर स्वार होते त्या महिलेला अद्याप चौकशीमध्ये सहभागी करण्यात आले नाही. कारण अद्याप तशी गरज निर्माण झाली नाही. होय, ती स्कूटी होती आणि सुशील आणि अजय तिथे स्कूटी घ्यायला गेले होते. या वस्तुस्थितीची पुष्टी झाली. सुशील कुमार आणि अजय यांनी उत्तराखंडमधील ऋषिकेश येथे राहणाऱ्या मित्राकडेही मदतीसाठी संपर्क साधला होता. त्या मित्राचीही अद्याप चौकशी केली नाही. ज्या लोकांची नावे आरोपीने घेतली आहेत त्यांच्याशी सध्या फोनवरच बोलून सत्य पडताळणी करीत असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. कारण या सर्वांमध्ये वेळ वाया घालवणे योग्य नाही. रिमांड कालावधीच्या 6 दिवसांपैकी आज (मंगळवार) दोन दिवस निघून गेलेत. प्रथम आम्हाला रिमांडमध्ये असलेल्या आरोपींची चौकशी करणे आवश्यक वाटले. आरोपीच्या रिमांड पूर्ण झाल्यानंतरच पुढील कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. यामध्ये वेळेचे कोणतेही बंधन नाही. सर्वात आधी घटनास्थळावर सीन रिक्रिएट करणे महत्वाचे असल्याचेही त्यांनी नमूद केले. (Mobile clips and CCTV footage of the chhatrasal murder in the hands of the police)