मुंबई : भारतात यंदा सर्वाधिक ‘न्यू इयर बेबीज’चा जन्म झाला. एक जानेवारी 2020 रोजी देशात तब्बल 67 हजार 385 बाळांनी जन्म (Most New Year Babies in India) घेतला. लोकसंख्येत दुसऱ्या स्थानावर असलेल्या भारताने ‘अव्वल’ चीनला मागे टाकत जगात पहिला क्रमांक पटकावला.
एक जानेवारी 2020 या दिवशी चीनमध्ये 46 हजार 229 बाळांनी जन्म घेतला. तर नायजेरियात 26 हजार 039, पाकिस्तानात 13 हजार 020, इंडोनेशियात 13,020 बालकांचा जन्म झाला. अमेरिकेत नववर्षाच्या पहिल्या दिवशी 10 हजार 452 बाळांना ‘ट्यॅहा’ केलं.
‘युनिसेफ’ने जगभरातील बाळांच्या जन्माची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. संपूर्ण जगात 1 जानेवारी 2020 रोजी जन्म घेतलेल्या बाळांपैकी तब्बल 17 टक्के बालकं भारतात जन्माला आली.
2020 मध्ये जगातील पहिल्या बाळाचा जन्म फिजी देशात झाला. तर एक जानेवारीच्या मुहुर्तावर जन्मलेलं शेवटचं बाळ अमेरिकेतील होतं.
विशेष म्हणजे एक जानेवारीचा मुहूर्त गाठत ‘01.01.2020’ अशी जन्मतारीख आपल्या बाळाला मिळावी, यासाठी काही गर्भवतींनी सिझेरियनचा पर्याय निवडल्याचीही माहिती (Most New Year Babies in India) आहे.