मुंबईः कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील गावांवर दावा केल्यानंतर सीमवादावरून ठिणगी पडली. त्यानंतर महाराष्ट्रातील नेत्यांनी केंद्र सरकारने सीमाप्रश्नी मध्यस्ती करावी अशी मागणी करण्यात आली होती. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मध्यस्तीनंतर दोन्ही राज्यातील मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करून हा प्रश्न सामोपचाराने सोडवण्याचा त्यांनी सल्ला दिला होता. त्यानंतरही बसवराज बोम्मई यांनी कर्नाटक विधानसभेत महाराष्ट्राला एक इंचही जागा देणार नाही असं चिथावणीखोर वक्तव्य केले.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर वादग्रस्त वक्तव्य करत असतानाच बसवराज बोम्मई यांनी खासदार संजय राऊत यांनी थेट देशद्रोही करून टाकले आहे. त्याचबरोबर संजय राऊत म्हणजे चीनचे एजंट असल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला आहे.
सीमावादावरून दोन्ही राज्यातील राजकीय वातावरण तापले असतानाच बसवराज बोम्मई यांनी आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
त्यांच्यावर टीका करताना संजय राऊत यांच्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो अशी टीकाही त्यांच्यावर करण्यात आली आहे.
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या विधानसभेत बोलताना त्यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. यावेळी ते म्हणाले की, संजय राऊत यांच्याकडून प्रक्षोभक विधान केली जातात.
त्यांच्या प्रक्षोभक वक्तव्यांमुळेच अनेकदा देशातील एकता भंग होते असा थेट त्यांच्यावर आरोपही करण्यात आला आहे. त्यामुळे आता बोम्मई यांच्या या वक्तव्यानंतर संजय राऊत का प्रतिक्रिया देतात याकडेच सर्वांचे लक्ष वेधले आहे.
खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करताना बसवराज बोम्मई यांनी संजय राऊत यांना थेट इशाराही दिला आहे. संजय राऊत यांची अडवणूक कशी करायची तेही आम्हाला माहिती असल्याचे त्यांनी म्हटले आहे.