मुंबई, भारतीय व्यवसायातील कुबेर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुकेश अंबानी (Mukesh Ambani Visit Badrinath) यांनी बद्रीनाथ धमाचे दर्शन घेतले. मंदिर समितीकडून मुकेश अंबानी यांचे विशेष स्वागत करण्यात आले. येथे मुकेह्स अंबानी यांनी विशेष पूजा देखील केली. पूजेनंतर त्यांनी मंदिराला पाच कोटींचे दान दिले. बद्रीनाथ येथे अंबानींचे कोकिलाबेन रेस्ट हाऊस आहे. याठिकाणी त्यांनी थोडा वेळ घालविला. त्यानंतर त्यांनी केदारनाथ येथेही भेट दिली व बाबा केदारनाथचे दर्शन घेतले. मुकेश अंबानी यांची बद्रीनाथ केदारनाथवर विशेष श्रद्धा आहे.
मुकेश अंबानी आपल्या सहकाऱ्यांसह विशेष विमानाने दर्शनासाठी बद्रीनाथ धामला आले होते. बद्रीनाथ धाममध्ये त्यांचे मंदिर समितीकडून स्वागत करण्यात आले होते. पूजाअर्चा केल्यानंतर त्यांनी बद्रीनाथ धाम समितीला 5 कोटींचे दान दिले. मंदिर समितीकडून त्यांना बद्री विशालच्या श्रृगांरात असलेली तुळशीची माळ भेट दिली. दर्शन घेतल्यानंतर ते काहीवेळ गर्भगृहात ध्यानासाठी बसले होते. पूजापाठ झाल्यावर त्यांनी आपले गेस्ट हाऊस कोकिळा निवासलाही भेट दिली. येथे थोडावेळ थांबल्यानंतर त्यांनी केदारनाथला प्रस्थान केले.
भगवान बद्री विशालवर मुकेश अंबानी यांची अतूट श्रद्धा आहे. त्यामुळे ते दरवर्षी बद्रीनाथला दर्शनासाठी येतात. गेल्या
महिन्यात खराब वातावरणामुळे त्यांना त्यांचा बद्रीनाथचा दौरा रद्द करावा लागला होता. मुकेश अंबानी यांनी गेल्या
महिन्यात आंध्र प्रदेशातील तिरुपती मंदिरात पूजा अर्चना केली होती आणि भगवान वेंकटेश्वराच्या पहाडी मंदिरासाठी 1.5
कोटींचे दान दिले होते.