कानपूरः उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायम सिंह यादव (Former Uttar Pradesh Chief Minister Mulayam Singh Yadav ) यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुलायम सिंह यादव यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु करण्यात आले आहेत. मुलायम यांची प्रकृती (health deteriorated) खालावताच समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव गुरुग्रामकडे रवाना झाले आहेत.
तर मुलायमसिंह यादव यांचे धाकटे बंधू शिवपाल यादव यांनी आधीच दिल्लीत थांबले आहेत. तर प्रतीक यादव आणि त्यांची पत्नी अपर्णा यादव यांनी देखील मेदांता हॉस्पिटलमध्ये येऊन डॉक्टरांची भेट घेतली आहे.
समाजवादी पार्टीचे मुलायम सिंह यादव यांची प्रकृती सध्या गंभीर आहे. गेल्या काही दिवसांपासून ते दिवसांपासून आजारी होते.
आज त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल केले गेले आहे. मुलायम सिंह यादव यांना गेल्या काही दिवसांपासून अनेक व्याधींनी जखडले होते.
नुकतेच त्यांना लखनऊच्या मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मुलायमसिंह यादव यांना पोटाचा विकार असून त्यांना मूत्रपिंडाचाही त्रास सुरू झाला आहे.
मागील काही दिवसापूर्वी त्यांना ही त्रास झाला होता, त्यानंतर त्यांना बरे वाटल्यानंतर घरी सोडण्यात आले होते. मात्र आता पुन्हा त्रास सुरु झाला असून आता त्यांची परिस्थिती नाजूक असल्याचे सांगण्यात येत आहे.
याआधीही मुलायम सिंह यादव यांची प्रकृती बिघडली होती. मागील वर्षी 1 जुलै रोजीही त्यांना मेदांता रुग्णालयामध्येच दाखल केले गेले होते. सध्या त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यानंतर तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.
मागील जुलै महिन्यात पत्नी साधना गुप्ता यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडत चालली होती. आज सकाळपासून त्यांची प्रकृती गंभीर बनल्याने त्यांना मेदांता रुग्णालयात दाखल केले गेले आहे.