मुंबई | 10 ऑगस्ट 2023 : 508 कि.मी. लांबीच्या मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनचा मार्ग बांधणीसाठी नॅशनल हायस्पीड रेल कॉरीडॉर लिमिटेडने अंतिम सिव्हील पॅकेज ( C-3 ) चे वाटप केल्याचे जाहीर केले गेले. त्यामुळे बुलेट ट्रेनच्या सर्व सिव्हील कंत्राटांचे वाटप पूर्ण झाले आहे. महाराष्ट्रात एकूण 135 किमीचा मार्गासाठी सिव्हील कंत्राट दिले आहे. महाराष्ट्रात समुद्राखालील बोगद्यासह एकूण सात बोगदे बांधले जाणार असून सर्वात मोठा 2.28 किमीचा लांबीचा पुल वैतरणा नदीवर बांधला जाणार आहे.
मुंबई ते अहमदाबाद या 508 किमी मार्गापैकी 352 किमी मार्गाचे बांधकाम गुजरातमध्ये वेगाने सुरु आहे. परंतू महाराष्ट्रातील काम जमीन संपादनास उशीर झाल्याने रखडले आहे. मुंबई ते अहमदाबाद बुलेट मार्गाचे काम एकूण 28 पॅकेजमध्ये विभागण्यात आले असून त्यात 11 सिव्हील पॅकेज आहेत. 33 महिन्यात अकरा कंत्राटाचे वाटप करण्यात आले आहे. गुजरात राज्यात वापी, बिलिमोरा, सूरत आणि भरूच या चार स्थानके आणि सुरत रोलींग स्टॉक डीपोटसह 237 किमी वायाडक्टच्या निर्मितीसाठीचे देशातील सर्वात मोठे सिव्हील कंत्राट 28 ऑक्टोबर 2020 मध्ये दिले गेले. महाराष्ट्र राज्यात ठाणे, विरार आणि बोयसर या तीन स्थानकांसह 135 कि.मी. वायाडक्टसाठी सिव्हील कंत्राट 19 जुलै 2023 रोजी दिले आहे.
508 किमी लांबीच्या बुलेट मार्गासाठीच्या सर्व 11 सिव्हील पॅकेजमध्ये 465 किमी लांबीचा वायाडक्ट, 12 स्थानके, 3 रोलिंग स्टॉक डिपोट, 10 कि.मी. वायाडक्टवाले 28 स्टील पुल, 24 नदी पुल, 7 कि.मी. लांबीची भारतातील पहिला समुद्राखालील बोगद्यासह एकूण 9 बोगद्यांचा समावेश आहे.
बुलेट ट्रेनच्या C-3 पॅकेजचा अतिरिक्त तपशील
• एकूण लांबी 135 किमी. (महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील शिळफाटा आणि झरोली गावांदरम्यान)
• व्हायाडक्ट आणि ब्रिज : 124 किमी
• पूल आणि क्रॉसिंग : 36 (12 स्टील पुलांसह )
• स्थानके: 3 म्हणजे ठाणे, विरार आणि बोईसर ( सर्व उन्नत )
• डोंगरातील बोगदे : 6
• नदी पूल : उल्हास नदी, वैतरणा आणि जगनी, बुलेट प्रकल्पातील सर्वात लांब पूल ( 2.28 किमी ) वैतरणा नदीवर बांधला जाईल.