मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या समुद्री बोगद्याचे काम कुठपर्यंत आलं, पाहा डिटेल्स

| Updated on: Oct 01, 2024 | 4:34 PM

मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या गुजरात राज्यातील मार्ग बांधणीचे काम वेगाने सुरु आहे. तसेच या बुलेट ट्रेनच्या महाराष्ट्रातील कामाची सध्याची काय स्थिती आहे याची माहिती नॅशनल हायस्पीड रेल कॉरीडॉर लिमिडेटने दिली आहे.

मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या समुद्री बोगद्याचे काम कुठपर्यंत आलं, पाहा डिटेल्स
Mumbai to Ahmedabad Bullet Train Project
Follow us on

मुंबई ते अहमदाबाद या 508 कि.मी.च्या बुलेट ट्रेनसाठी देशातील पहिला समुद्राखाली बोगद्याचे काम सुरु आहे. एकूण 21 किमी लांबीच्या या बोगद्यापैकी 7 किमीचा बोगदा ठाण्याच्या खाडी खालून जाणार आहे. वांद्रे-कुर्ला संकुल येथील बुलेट ट्रेन भूमिगत स्थानक ते शिळफाटा दरम्यान हा 21 किमी लांबीचा भारतातील पहिला समुद्राखालील बोगदा बांधण्यात येत आहे.या बोगद्याच्या 21 किमीपैकी 16 कि.मी.चा भाग टनेल बोअरिंग मशिनद्वारे तर उर्वरित 5 कि.मी. चा भाग एनएटीएमद्वारे आहे. यात ठाणे खाडीखालून जाणारा 7 किलोमीटरचा समुद्राखालील बोगद्याचाही समावेश आहे.

खालील ठिकाणी खोदकाम सुरू आहे

1) मुंबई एचएसआर स्थानकाच्या बांधकामस्थळी शाफ्ट 1 : शाफ्ट – 1 ची खोली 36 मीटर आहे, सेकेंट पायलिंगचे 100% टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित खोदकाम सुरू आहे.

2) विक्रोळीतील शाफ्ट 2 : शाफ्ट-2 ची खोली 56 मीटर आहे, सेकेंट पायलिंगचे 100% टक्के काम पूर्ण झाले आहे. आजपर्यंत शाफ्टसाठीचे सुमारे 92% खोदकाम पूर्ण झाले आहे.

3) सावली ( घणसोलीजवळ ) येथील शाफ्ट 3 : शाफ्ट-3 ची खोली 39 मीटर आहे, येथील 100% खोदकाम पूर्ण झाले आहे, त्यामुळे या वर्षाच्या अखेरीस येथे पहिले टनेल बोअरिंग मशीन खाली जमिनीत टाकण्यासाठी उपलब्ध होणार आहे.

4) शिळफाटा : बोगद्याचे हे एनएटीएम टोक आहे. पोर्टलचे काम पूर्ण झाले असून आतापर्यंत 200 मीटर खोदकाम पूर्ण झाले आहे.

5) एडीआयटी ( एडिशनल ड्रिव्हन इंटरमीडिएट टनेल ) पोर्टल : 394 मीटर लांबीचा एडीआयटी बोगदा 6 महिन्यांच्या विक्रमी वेळेत पूर्ण झाला आहे. यामुळे शिळफाटा व्यतिरिक्त खोदकामासाठी दोन अतिरिक्त एनएटीएम फेसची सोय झाली आहे. या अतिरिक्त प्रवेशामुळे 700 मीटरहून अधिक भुयारी मार्गाचे काम पूर्ण झाले आहे.

Mumbai to Ahmedabad Bullet Train Project Tunnel works update –

Mumbai to Ahmedabad Bullet Train Project

एडीआयटीचा बोगद्याचा उपयोग काय ?:

एडीआयटीचा बोगद्याचे  11-मीटर x 6.4 मीटर बांधकाम झाले आहे. याचा एडीआयटी बोगद्याचा वापर ऑपरेशनदरम्यान मुख्य बोगद्यात थेट वाहनांना प्रवेश देईल आणि आपत्कालीन परिस्थितीत स्थलांतर प्रक्रियेच्या उद्देशाने देखील होऊ शकतो.

या उपकरणाने दोष शोधले जात आहेत

बांधकामस्थळांवर काही भाग झुकला वा कंपन झाले, सेटलमेन्ट, क्रॅक आणि खचला तर यांचे निरीक्षण करण्यासाठी अनेक यंत्रणांचा वापर केला जात आहे. यात इंक्लिनोमीटर, व्हायब्रेशन मॉनिटर, ग्राउंड सेटलमेंट मार्कर, टिल्ट मीटर आदी विविध प्रकारची जिओटेक्निकल उपकरणे बसविण्यात आली आहेत. खोदकाम आणि बोगद्यासारख्या सुरू असलेल्या भूमिगत कामांना किंवा जागेच्या सभोवतालच्या वास्तूंना कोणताही धोका निर्माण होऊ नये, यासाठी ही उपकरणे महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.