उड्डाण केल्यानंतर एअर इंडियाचे ते फ्लाईट गेले कुठे ? तब्बल 28 वर्षांनंतर प्रवाशाच्या घरी पत्र आले, उडाली खळबळ

| Updated on: Jun 17, 2024 | 1:24 PM

वैमानिकाने अपघातापूर्वी कोणताही पूर्व संकेत दिला नाही. त्यामुळे एटीएसला काही समजू शकले नाही. याअपघाताने एक प्रश्नचिन्ह निर्माण केला होता. बरोबर 16 वर्षांनी त्याच जागी पुन्हा एक अपघात घडला.

उड्डाण केल्यानंतर एअर इंडियाचे ते फ्लाईट गेले कुठे ? तब्बल 28 वर्षांनंतर प्रवाशाच्या घरी पत्र आले, उडाली खळबळ
accident of Air India flight - 245
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

विमानाचा प्रवास सर्वात वेगवान असल्याने आपण विमान प्रवासाचा आता सर्रास वापर करतो. परंतू विमान अपघाताची काही घटनांची आजही आठवण काढली जाते. मुंबईहून उडालेले एअर इंडियाचे ते विमान त्याच्या मुक्कामावर पोहचलेच नाही. लंडनला निघालेले हे विमान मध्येच युरोपातील मॉन्ट ब्लॅंकच्या पर्वतीय रांगांमध्ये कोसळले. या भीषण अपघातात विमानातील कर्मचाऱ्यांसह 48 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर 16 वर्षांनी असाच विमान अपघात घडला होता. हे विमान देखील याचे बर्फाळ पर्वत रांगात कोसळले. यावेळी अपघातील मृत्यूची संख्या मोठी होती. यावेळी क्रु मेंबर्ससह 106 जण ठार झाले होते. या दोन विमान अपघाताची कहाणी काय आहे. त्यावेळी नेमके काय घडलं होतं पाहूयात….

साल 1950 चा 3 नोव्हेंबरचा तो काळाकुट्ट दिवस होता. एअर इंडीयाच्या ( Air India Flight-245 ) फ्लाईट क्रमांक 245 ने सहार आंतरराष्ट्रीय विमानतळावर उड्डाण घेतले. विमानात 40 प्रवासी आणि 8 क्रु मेंबर्स होते. या विमानाला मुंबईतून लंडनला जायचे होते. हा प्रवास मोठ्या अंतराचा होता. विमानाने सकाळी सहार विमानतळावरुन उड्डाण घेतले. प्रवास मोठा असल्याने या विमानाला कायरोनंतर जिनेव्हा येथे थांबा घ्यायचा होता. हे विमान L-749 A मॉडलचे होते. या विमानाला चार प्रोपेलर इंजिन्स होती.

हवामान बदलले अन्

यावेळी अचानक हवामान बदल्याने वैमानिकांची कसोटी होती. या विमानाला प्रवासात फ्रान्सवरुन माऊंड ब्लॉंक पर्वतावरुन जायचे होते. विमानाचा 34 वर्षीय कॅप्टन एलन आर. सैंट उडवित होते. त्यांच्या सोबत सह पायलट व्ही.वाय. कोरगावकर होते. प्रवासादरम्यान एअर ट्रॅफीक कंट्रोलमधील अधिकारी वैमानिकांशी सातत्याने संपर्कात होते. परंतू विमानाचा संपर्क अचानक एटीसीशी संपर्क तुटला.

रेडिओचा सिग्नल तुटला आणि

एटीसीमधील संपर्क रेडीओ सिग्नल तुटला तर विमानाचे काही बरेवाईट झाले असे समजले जाते. काही वेळा सिग्नल पुन्हा प्रस्थापित होतो. एटीसी लागोपाठ एअर इंडियाच्या फ्लाईट-245 शी संपर्क करण्याचा प्रयत्न करीत होती. परंतू कोणतेही उत्तर आले नाही. ही शांतता अपघाताची शंका व्यक्त करीत होती. एक सर्च टीम फ्लाईटचे लोकेशन तपासण्यासाठी पाठविण्यात आली. अनेक तास झाले परंतू विमानाचा काहीही थांगपत्ता लागला नाही. दोन दिवस मॉंट ब्लॉंकच्या पर्वत रांगात दोन तपासणी झाली. परंतू काहीही सापडले नाही. अखेर विमानाचे काही तुकडे सापडले. त्यामुळे विमान याचे भागात दुर्घटनाग्रस्त झाले.

पायलटने काही संकेत दिले नाही

पांढऱ्या शुभ्र बर्फात हे विमान लुप्त झाले होते. या विमानाचे केवळ काही तुकडे सापडले. विमानातील सर्व लोकांचे मृतदेह सापडले नाहीत. त्यावेळेचे तंत्रज्ञान इतके प्रगत नव्हते. अपघातापूर्वी पायलटने एटीसीला कोणत्याही बिघाडाची माहिती दिली नव्हती. तसेच त्याने मेडे कॉल ( MayDay Call ) केला नाही. आपत्कालीन परिस्थितीत मेडे कॉल केला जातो. म्हणजेच विमान आपल्या नियंत्रणाबाहेर गेले आहे आणि अपघात होऊ शकतो असे पायलटला वाटत असेल तर तो एटीसीला तीन वेळा ‘मेडे मेडे मेडे’ असे म्हणतो. त्यामुळे विमानासोबत अपघात होणार असल्याची माहिती एटीसीला मिळाली असती. परंतू असा कोणताही सिग्नल पायलटने दिला नाही.

विमान 15,340 उंचीवर होते

हे विमान जवळपास 15,340 उंचीवर असताना हा अपघात झाला होता. जर पायलटने विमानातील कोणत्याही गडबडी बाबत काही संकेत दिले नव्हते म्हणजे विमानाचे सर्व भाग व्यवस्थित काम करीत होते. तपास यंत्रणेने या अपघाताच्या काही संभाव्य कारणांचा तपास करण्यात आला होता. असे मानले जाते की वाईट हवामानामुळे खूप उंचावर असल्याने विमानाच्या वैमानिकाला बर्फाळ डोंगरांच्या रांगाचा अंदाज आला नाही. त्यामुळे हे विमान डोंगराच्या रांगाना धडकून खाली कोसळले.

त्यावेळी आपण प्रगत नव्हतो

1950 च्या दशकात आपण एवढे प्रगत नव्हतो, त्यावेळी एडव्हान्स जीपीएस, फ्लाइट चार्ट आणि नेव्हीगेशन सिस्टम नव्हती. त्यावेळी विमानात अल्टीमेटर्सचा वापर केला जात होता. त्याद्वारे त्याच्या लोकेशनचा शोध लागला असता. परंतू पर्वतांमध्ये कधी कधी अल्टीमीटरने चुकीचे वाचन केले तर अंदाजही चुकत होता. ढगांमध्ये पांढरे बर्फाचे डोंगर सहजासहजी दिसत नव्हते. जेव्हा हा पांढरा पर्वत दिसला तोपर्यंत खूप उशीर झाला असावा. पण त्यावेळी अल्टीमीटर शिवाय भौगोलिक स्थानाच्या मार्गदर्शनासाठी दुसरा काही पर्याय नव्हता. एअर इंडियासोबतही याच चुकीमुळे हा अपघात झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात होता.

अनेक फ्लाइट्स या मार्गावरुन उडतात

आजही अनेक विमाने या मार्गावरुन उडत असतात. परंतू आता असे अपघात अपवादाने घडते. कारण आजच्या काळात वैमानिकांजवळ प्रायमरी सर्व्हेलन्स रडार, सेकंडरी सर्व्हेलन्स रडार, जीपीएस आणि सॅटेलाइट्स सारख्या अनेक सुविधा असतात. विमानातील वेदर रडार अॅक्यूरन्सी सर्व माहीती पायलटला देत असतात. त्यामुळे असे अपघात अपवादानेच घडतात. तसेच पायलटजवळ एक चार्ट असतो, ज्यात त्या सर्व एरिया संपूर्ण नकाशा असतो. या सर्व भौगोलिक रचना दर्शविलेली असते आणि विमानाची उड्डाणादरम्यान ते किती उंचावर ठेवायचे याची संपूर्ण माहीती दिलेली असते.

16 वर्षांनंतर दुसरा अपघात

एअर इंडियाच्या या विमान अपघाताचं प्रकरण काही काळानंतर विसरले गेले. मात्र या घटनेला 16 वर्षे पूर्ण झाल्यानंतर याच ठिकाणी पुन्हा एक विमान अपघात झाला. 16 जानेवारी 1966 रोजी ज्या टेकडीवर फ्लाइट क्रमांक 245 क्रॅश झाले होते. त्याच ठिकाणी एअर इंडियाचे फ्लाइट क्रमांक 101 क्रॅश झाले. एअर इंडियाच्या फ्लाइट क्रमांक 101 च्या अपघातात 11 क्रू मेंबर्ससह तब्बल 106 प्रवाशांचा मृत्यू झाला. या अपघातालाही एअर इंडिया फ्लाइट 245 सारखीच परिस्थिती जबाबदार ठरली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

आणि एके दिवशी पत्र आलं

बर्फाचे डोंगर वितळल्यानंतर एअर इंडियाच्या दोन्ही विमानांचे अवशेष काही वर्षांपूर्वी सापडले. या पर्वतांवर अनेक गिर्यारोहक चढत असतात. त्यांनाही या विमानाचे इंजिन सापडते तर कधी विमानाचा तुटलेला भाग सापडतो. 8 जून 1978 रोजी फ्रान्सच्या एका पोलिसाला एक लेटरचे बंडल ( 55 पत्रे आणि 57 लिफाफे ) मिळाले. ही पत्रे फ्लाइट क्रमांक 245 मध्ये प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाची होती, ज्याचा 28 वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. पण बर्फात गाडलेली त्याची पत्रे अजूनही सुरक्षित होती. त्यामुळे या पोलीस कर्मचाऱ्याने ती पत्रे प्रवाशांनी लिहीलेल्या पत्त्यावर पोस्ट केली.

अजूनही काही सुटे भाग सापडत असतात

फ्रान्सच्या या पोलिसांनी प्रवाशांच्या पत्त्यांवर सुमारे 55 पत्रे पोस्ट केली. जेव्हा प्रवाशाच्या कुटुंबीयांना इतक्या वर्षांनी ही पत्रे मिळाली तेव्हा ती पत्रे पाहून ते आश्चर्यचकित झाले. आपल्या कुटुंबातील तो सदस्य जिवंत असावा असे त्यांना वाटू लागले. पण नंतर त्यांना सत्य समजले की ही पत्रे एका पोलिसाला मिळाली होती आणि त्याने ती पोस्ट केली होती. इतकी वर्षे लोटली तरीही आजही या ठिकाणाहून रोज काही ना काही मिळत असतं. कधी एअर इंडियाच्या फ्लाईट क्र. 245 शी संबंधित गोष्टी तर कधी फ्लाईट क्र.101 चे सुटे भाग सापडत असतात.