नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज गुरु तेग बहादुर यांच्या 400 व्या प्रकाश पर्वानिमित्त देशाला संबोधित केलं. त्यावेळी पंतप्रधानांनी गुरु तेग बहादुर (Guru Teg Bahaddur) यांच्या त्यागाला नमन केलं. देशाला संबोधित करताना मोदी म्हणाले की, ‘आता शब्तकीर्तन ऐकून जी शांती मिळाली ती शब्दात सांगू शकत नाही. आज मला गुरुला समर्पित स्मारक पोस्ट तिकीट (Post Ticket) आणि शिक्क्याचं लोकार्पण करण्याचं सौभाग्य मिळालं. मला आनंद आहे की आज आपला देश पूर्ण निष्ठेने आपल्या गुरुंच्या आदर्शावर पुढे जात आहे. मी सर्व 10 गुरुंच्या चरणी आदरपूर्वक नमस्कार करतो. मी सर्व देशवासियांना प्रकाश पर्वाच्या शुभेच्छा देतो’. इतकंच नाही तर ‘आपल्याला असा भारत घडवायचा आहे, ज्याची ताकद जगाला दिसेल, जो जगाला नव्या उंचीवर घेऊन जाईल. देशाचा विकास आणि प्रगती हे आपलं कर्तव्य आहे’, असं आवाहनही मोदींनी देशवासियांना केलं.
मोदी पुढे म्हणाले की, हा लाल किल्ला कितीतरी महत्वपूर्ण कालखंडाचा साक्षी राहिला आहे. या किल्ल्याते गुरु तेग बहादूर साहेबांचं शहीदत्व पाहिलं आहे. यापूर्वी 2019 मध्ये गुरुनानक देव यांचा 550 वा प्रकाश पर्व आणि 2017 मध्ये गुरु गोविंद सिंह यांचा 350 वा प्रकाश पर्व साजरा करण्याची संधी आपलल्याला मिळाली होती. मला आनंद आहे की आपला देश पूर्ण निष्ठेसह गुरुंच्या आदर्शावर पुढे जात आहे. या पुण्यवेळी मी सर्व 10 गुरुंच्या चरणाला नमन करतो. तुम्हा सर्वांना, सर्व देशवासियांना आणि संपूर्ण देशातील गुरुवाणीवर आस्था असलेल्या सर्वांना प्रकाश पर्वाच्या शुभेच्छा देतो.
We bow to Sri Guru Tegh Bahadur Ji on his Parkash Purab. https://t.co/c1uRCOSZta
— Narendra Modi (@narendramodi) April 21, 2022
लाल किल्ला अनेक महत्वाच्या कालखंडाचा साक्षीदार राहिलाय. या किल्ल्याने गुरु तेग बहादुरजी यांचं शहीदत्व पाहिलं आहे. तसंच देशासाठी बलिदान देणाऱ्या महामानवांच्या धैर्यही पाहिलं आहे. स्वातंत्र्यानंतरच्या 75 वर्षात भारताच्या अनेक स्वप्नांचा प्रतिध्वनी इथूनच घुमला. त्यामुळे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात लाल किल्ल्यावर होणारा हा कार्यक्रम महत्वाचा आहे. शेकडो वर्षाच्या गुलामगिरीतून मिळालेलं स्वातंत्र्य भारताच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक प्रवासापासून वेगळेपणाने पाहिले जाऊ शकत नाही. त्यामुळेच आज देश एकाच वेळी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि गुरु तेग बहादूर साहिब यांचा 400 वा प्रकाश पर्व साजरा करत असल्याचंही मोदी म्हणाले.
गुरु नानकदेव जी ने पूरे देश को एक सूत्र में पिरोया। गुरु तेग बहादुर जी के अनुयायी हर तरफ हुये।
पटना में पटना साहिब और दिल्ली में रकाबगंज साहिब, हमें हर जगह गुरुओं के ज्ञान और आशीर्वाद के रूप में ‘एक भारत’ के दर्शन होते हैं।
– प्रधानमंत्री श्री @narendramodi pic.twitter.com/igInycJ9ry
— BJP (@BJP4India) April 21, 2022
‘देशात धार्मिक कट्टरतेचे वादळ होते. धर्माला तत्त्वज्ञान, विज्ञान आणि आत्मसंशोधनाचा विषय मानणारे, धर्माच्या नावाखाली हिंसाचार आणि अत्याचार करणारे लोक आपल्या भारतासमोर होते. त्यावेळी भारताला गुरु तेग बहादूरजींच्या रूपात आपली ओळख जतन करण्याची मोठी आशा होती. त्यावेळी गुरू तेग बहादूर ‘हिंद दी चादर’ बनून औरंगजेबाच्या जुलमी विचारसरणीसमोर एखाद्या खडकाप्रमाणे उभे राहिले. गुरु नानक देव यांनी संपूर्ण देशाला एका धाग्यात बांधले आहे. गुरू तेग बहादूरजींचे अनुयायी सर्वत्र होते. पटनामधील पटना साहिब आणि दिल्लीतील रकाबगंज साहिब, आपल्याला सर्वत्र ‘एक भारत’ गुरुंच्या आशीर्वादाच्या रूपात दिसतोय’
मागील वर्षीच सरकारने साहिबजादांच्या महान बलिदानाच्या स्मरणार्थ 26 डिसेंबरला वीर बाल दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. आमचे सरकार शीख परंपरेतील तीर्थक्षेत्रांना जोडण्यासाठी सतत प्रयत्न करतेय. श्री गुरु ग्रंथ साहिब जी आपल्यासाठी आत्म-साक्षात्काराचे मार्गदर्शक तसेच भारताच्या विविधतेचे आणि एकतेचे जिवंत स्वरूप आहेत. त्यामुळे जेव्हा अफगाणिस्तानमध्ये संकट उभं राहिलं होतं, तेव्हा आपल्या पवित्र गुरु ग्रंथसाहिब परत आणण्याचा प्रश्न निर्माण होतो, तेव्हा भारत सरकारने आपली पूर्ण ताकद लावली.
नई सोच, सतत परिश्रम और शत-प्रतिशत समर्पण, ये आज भी हमारे सिख समाज की पहचान है। आजादी के अमृत महोत्सव में आज देश का भी यही संकल्प है। हमें अपनी पहचान पर गर्व करना है।
हमें लोकल पर गर्व करना है, आत्मनिर्भर भारत का निर्माण करना है।
– प्रधानमंत्री श्री @narendramodi pic.twitter.com/2RTEswDrak
— BJP (@BJP4India) April 21, 2022
भारताने कधीही कोणत्या देशाला किंवा समाजाला धोका निर्माण केला नाही. आजही आपण संपूर्ण जगाच्या कल्याणाचा विचार करतो. जेव्हा आपण स्वावलंबी भारताबद्दल बोलतो तेव्हा आपण संपूर्ण जगाची प्रगती हे ध्येय समोर ठेवतो. नवा विचार, मेहनत आणि समर्पण, हीच शीख समाजाची आजही ओळख आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात आज देशाचा हा संकल्प आहे. आपल्या अस्मितेचा अभिमान असायला हवा. आपल्याला स्थानिकांचा अभिमान असायला हवा, आपल्याला स्वावलंबी भारत घडवायचा आहे, असं मतही मोदींनी व्यक्त केलंय.
India has never posed a threat to any country or society. Even today we think about the welfare of the whole world: PM Narendra Modi at the 400th Parkash Purab celebrations of Sri Guru Teg Bahadur at Red Fort, Delhi. pic.twitter.com/lHq4BhkE5V
— ANI (@ANI) April 21, 2022
आपल्याला असा भारत घडवायचा आहे, ज्याची ताकद जगाला दिसेल, जो जगाला नव्या उंचीवर घेऊन जाईल. देशाचा विकास आणि प्रगती हे आपलं कर्तव्य आहे. त्यासाठी सर्वांच्या प्रयत्नांची गरज आहे. मला खात्री आहे की गुरुंच्या आशीर्वादाने भारत वैभवाच्या शिखरावर पोहोचेल. जेव्हा आपण स्वातंत्र्याची 100 वर्षे साजरी करू तेव्हा एक नवा भारत आपल्यासमोर असेल, असा दावाही मोदी यांनी यावेळी केलाय.
इतर बातम्या :