Narendra Modi Rajya Sabha Speech | नरेंद्र मोदींनी वाचला कृषीविषयक योजनांचा पाढा, चर्चेने मार्ग काढू शेतकऱ्यांना आवाहन

| Updated on: Feb 08, 2021 | 11:55 AM

नव्या कृषी कायद्यांविषयी बोलताना नरेंद्र मोदींनी 2014 पासून शेतकऱ्यांसाठी आणलेल्या योजनांचा पाढा वाचला. Narendra Modi Farmers Protest

Narendra Modi Rajya Sabha Speech | नरेंद्र मोदींनी वाचला कृषीविषयक योजनांचा पाढा, चर्चेने मार्ग काढू शेतकऱ्यांना आवाहन
नरेंद्र मोदी, पंतप्रधान
Follow us on

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi Parliament Speech) राज्यसभेत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणावर उत्तर देत आहेत. यावेळी त्यांनी कृषी कायदे, शेतकरी आंदोलन आणि शेतीमधील सुधारणा यावर भाष्य केलं. नव्या कृषी कायद्यांविषयी बोलताना नरेंद्र मोदींनी 2014 पासून शेतकऱ्यांसाठी आणलेल्या योजनांचा पाढा वाचला. शेतकरी पेन्शन योजना, पंतप्रधान किसान सन्मान योजना, किसान रेल, पीक विमा, किसान क्रेडिट कार्ड या योजनांचा उल्लेख केला. (Narendra Modi speech on President Ramnath Kovind Address revise schemes related Farmers)

पीक विमा योजनेअंतर्गत 90 हजार कोटी रुपयांचा क्लेम शेतकऱ्यांना मिळाला: मोदी

2014 नंतर काही परिवर्तन केले, पीक विमा योजना वाढवली, जेणेकरुन छोटे शेतकरी त्याचा फायदा घेऊ शकतील, गेल्या चार -पाच वर्षात पीक विमा योजनेअंतर्गत 90 हजार कोटी रुपयांचा क्लेम शेतकऱ्यांना मिळाला. ही रक्कम कर्जमाफीपेक्षा मोठी होते, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

पंतप्रधान किसान सन्मान योजना

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम पाठवली. दहा कोटी शेतकऱ्यांना याचा फायदा झाला आहे. बंगालचे शेतकरी जर यात जोडले गेले असते तर हा आकडा मोठा असता. आतापर्यंत 1 लाख 15 हजार कोटी रुपये या शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवले असल्याचं नरेंद्र मोदींनी सांगतिलं.

छोट्या शेतकऱ्यांसाठी पेन्शन योजना आणली

10 कोटी शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ दिला. बंगालचं राजकारण आडवं आलं नसतं तर हा आकडा मोठा असता, छोट्या शेतकऱ्यांसाठी पेन्शन योजना आणली, आम्ही पहिल्यांदाच किसान रेल्वे आणली, याचा फायदा छोट्या शेतकऱ्यांना झाल्याचा दावा मोदींनी केला.

किसान क्रेडिट कार्ड

नरेंद्र मोदी यांनी यावेळी देशातील पावणे दोन कोटी शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड दिल्याचं म्हटलं आहे.

आम्ही, कृषीमंत्री शेतकरी आंदोलकांच्या संपर्कात आहोत, त्यांच्याशी चर्चा सुरु आहेत, मिळून मिसळून चर्चा करु, वृद्ध शेतकऱ्यांच्या आरोग्याला बाधा पोहोचू नये, आज मी संसदेतूनही आवाहन करतो, चर्चेने मार्ग काढू, तुम्हाला लोकशाहीत आंदोलनाचा हक्क आहे, आपल्याला देशाला पुढे घेऊन जायचं आहे, मागे नाही. पक्ष-विपक्ष असो, या सुधारणांना आपण संधी द्यायला हवी, या परिवर्तनाने लाभ होतो की नाही हे पाहावं लागेल, काही कमतरता असेल तर त्यात सुधारणा करु, आपण काही दरवाजे बंद करत नाहीत. मंडई अधिक प्रतिस्पर्धी होतील, लाभ होईल, MSP होता, आहे आणि राहील. या सभागृहाच्या पवित्र्यातून आम्ही ही ग्वाही देतो, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

संबंधित बातम्या :

Narendra Modi Parliament Speech | भाषण संसदेत, डोळा बंगालच्या मतांवर? नरेंद्र मोदी यांच्या भाषणात बंगाल


(Narendra Modi speech on President Ramnath Kovind Address revise schemes related Farmers)