देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. विरोधकांनी दारुगोळा जमा केला आहे. तर सत्ताधाऱ्यांनी कुरघोडीची संधी सोडलेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, या सर्व घडामोडींवर देशातील सर्वात मोठे न्यूज नेटवर्क टीव्ही9 शी दिलखुलास चर्चा केली. TV9 ग्रुपच्या पाच व्यवस्थापकीय संपादकांनी घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी या चर्चांवर रोखठोक मत मांडलं. टीव्ही9 च्या महामुलखातीत मोदींनी घटना बदलाचा दाखल देत नेहरुविरोधी राग आळवला.
काँग्रेसने संविधानाच्या तोडल्या मर्यादा
पंतप्रधान मोदींनी मुलाखतीत काँग्रेससह देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यावर हल्लाबोल केला. काँग्रेसने संविधानाच्या मर्यादा तोडल्या. काँग्रेसने अधिकृतरित्या संजीव रेड्डी यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार ठरवलं होतं. अधिकृतरित्या. त्यानंतर त्यांच्या पाठीत सुरा खूपसून त्यांना पराभूत केलं. गेनचा खेळ आहे. त्यांनी संविधानासोबत नेहमी छेडछाड केल्याचा आरोप त्यांनी केला.
नेहरुंवर टीका
नेहरू.एवढे मोठे लोकशाहीचे चेहरा म्हणता ना… संसदेत त्यांनी सर्वात आधी संविधानात दुरुस्ती केली ती फ्रिडम ऑफ स्पीचवर रिस्ट्रिक्शन आणणारं. पूर्णपण अलोकशाहीवादी नेहरूंनी केलं होतं, अशी टीका त्यांनी केली. यापूर्वी पण नरेंद्र मोदी यांनी अनेकवेळा नेहरुंवर, त्यांच्या धोरणांवर टीका केली आहे.
पाप करायचं असतं तर अगोदरच केलं असतं
पहिली गोष्ट म्हणजे, आज आपल्याकडे किती जागा आहे. आजही एनडीएकडे सुमारे ३६० जागा आहेत, आणि एनडीएच्या व्यतिरिक्त म्हणजे बीजेडी एनडीएत नाही. पण त्यांच्या जागाही गृहित धरल्यास आम्ही ४००च्या पुढे आहोत. गेल्या पाच वर्षापासून आम्ही ४०० जागा घेऊन बसलो आहोत. जर असं पाप कुणाला करायचं असतं तर तेव्हाच केलं असतं. हा तर्क नाही, सत्यही नाही. पण हे का केलं जातंय, कारण त्यांच्याकडे त्यांचा इतिहास पाहा… जे पक्ष काँग्रेस पक्षाच्या संविधानाचे पावित्र्य मानत नाही, तो पक्ष देशाच्या संविधानाला कसं मानणार? काँग्रेस पक्षाच्या संविधानाला नष्ट करण्याचं काम या कुटुंबाने केल्याची टीका त्यांनी केली.
मूळ संविधान आम्ही छापलं