सर्वात मोठी बातमी ! नरेंद्र तोमर ते राज्यवर्धन राठोड… भाजपचे 12 नेते खासदारकीचा राजीनामा देणार; कारण काय?

| Updated on: Dec 06, 2023 | 3:02 PM

भाजपाने मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान विधानसभा जिंकत उत्तरेत आपला दबदबा वाढविला आहे. यावेळी अनेक खासदारांना भाजपाने विधानसभा निवडणूकीत उतरविले होते. परंतू आता त्यांना खासदारकीचा राजीनामा देण्यास सांगण्यात आले आहे. भाजपाने आता या राज्यात भाकरी फिरविण्याचा निर्णय घेतला असल्याचे म्हटले जात आहे.

सर्वात मोठी बातमी ! नरेंद्र तोमर ते राज्यवर्धन राठोड... भाजपचे 12 नेते खासदारकीचा राजीनामा देणार; कारण काय?
Assembly Election 2023
Follow us on

मुंबई | 6 डिसेंबर 2023 :  पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणूकांमध्ये तीन राज्यात मोठ्या फरकाने विजयी झालेल्या भाजपाने बुधवारी मोठा निर्णय घेतला आहे. मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड येथे भाजपाचे सरकार येणार आहे. आता भाजपाचे जे खासदार विधानसभा निवडणूक जिंकले आहेत. ते आता लोकसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देणार आहेत. अशा भाजपा 12 खासदारांनी बुधवारी राजीनामा दिला आहे. त्यामुळे तीन राज्यातील नव्या सरकारमध्ये नवीन मुख्यमंत्र्याचा चेहरा पाहयाला मिळणार का ? याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

विविध एक्झिट पोल आणि पत्रकारांनी वर्तवलेल्या अंदाजाला कलाटणी देत भाजपाने मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड येथे सत्ता मिळविली आहे. तर तेलंगणा येथे कॉंग्रेसला बहुमत मिळाले असले तरी भाजपाला आठ जागा मिळाल्या आहेत. भाजपाने यंदा चार राज्यातील विधानसभा निवडणूकीत 21 खासदारांना तिकीट देऊन उभे केले होते. राजस्थान आणि मध्य प्रदेशात सात-सात खासदारांनी निवडणूक लढविली होती. तर छत्तीसगडमध्ये चार आणि तेलंगणात तीन खासदारांना भाजपाने विधानसभेचे तिकीट दिले होते.

आता भाजपा वरिष्ठ नेत्यांशी विधानसभा जिंकलेल्या खासदारांची भेट घेतली आणि त्यांनी आपले लोकसभेचे सदस्यत्व सोडण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपाचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्यासोबत सर्व खासदार राजीनामा देण्यासाठी लोकसभा अध्यक्षांना भेटायला गेले.

कोठून कोण देणार राजीनामा ?

राजस्थान –

– राज्यवर्धन राठोड

– दीया कुमारी

– किरोडीलाल मीना ( राज्यसभा सदस्य )

मध्य प्रदेश –

– नरेंद्र तोमर

– प्रल्हाद पटेल
– राकेश सिंह

– रीती पाठक

– उदयप्रताप सिंह

छत्तीसगढ़

– गोमती साई

– अरुण साव

मोदी कॅबिनेटचे तीन मंत्री कमी होणार

लोकसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देणाऱ्यात प्रल्हाद पटेल आणि नरेंद्र तोमर हे केंद्रीय मंत्री आहेत. तर छत्तीसगडच्या खासदार आणि केंद्रीय मंत्री रेणुका सिंह या देखील राजीनामा देतील. याप्रकारे केंद्रीय कॅबिनेटची तीन मंत्री कमी होणार आहेत. तसेच राजस्थानचे खासदार बाबा बालकनाथ हे देखील राजीनामा देतील, राजीनामा देणाऱ्या खासदाराची संख्या 12 असल्याचे म्हटले जात आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानात दिल्लीतून निरीक्षक पाठविले जाणार आहे. आज सायंकाळी किंवा उद्यात निरीक्षक जातील. त्यानंतर तीन राज्यातील विधीमंडळ पक्षाची बैठक होईल. त्यानंतर मु्ख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा केली जाणार आहे.

भाजपाने कोणाला कुठून तिकीट दिले होते –

मध्य प्रदेश –

नरेंद्र तोमर, फग्गन सिंह कुलस्ते, प्रल्हाद सिंह पटेल, राकेश सिंह, रीती पाठक, राव उदयप्रताप सिंह, गणेश सिंह यांना तिकीट दिले होते.

राजस्थान –

 बाबा बालकनाथ, भागीरथ चौधरी, किरोडीलाल मीणा, दीया कुमारी, नरेंद्र खीचड़, राज्यवर्धन राठोड, देवजी पटेल यांना विधानसभेचे तिकीट दिले होते.

छत्तीसगड –

विजय बघेल, गोमती साय, रेणुका सिंह, अरुण साव या खासदारांना विधानसभा निवडणूकीत उतरविले होते

 तेलंगाना – 

बंदी संजय कुमार, धर्मपुरी अरविंद आणि सोयम बाबू यांना तिकीट दिले होते.