Mars Mission : जगभरातील अंतराळ संशोधन संस्थांना आता लालग्रह मंगळ खुणावत आहे. मंगळावर मानवाला पाठविण्याची तयारी अनेक अंतराळ संशोधन संस्था करीत आहेत. मानवाने चंद्रावर पहिले पाऊल ठेवले त्याला 55 वर्षे पूर्ण झाली आहेत. आता मानवाला मंगळ ग्रह खुणावत आहे. नॅशनल एअरोनॉटिक्स स्पेस एडमिनिस्ट्रेशन ( NASA ) ची साल 2030 पर्यंत मंगळावर मानवासह स्वारी करायची योजना आहे. मंगळाला एक फेरी मारण्यासाठी दोन वर्षे लागू शकतात. परंतू नासाच्या रॉकेटद्वारे मानव दोन महिन्यांत मंगळावर पोहचू शकते. नासाच्या संशोधकांच्या एक टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट कंपनीने एका नवा प्रोपल्शन सिस्टीमवर काम करीत आहे.
ही प्रोपल्शन सिस्टीम लाल ग्रह मंगळावर पोहचण्यासाठी नऊ महिन्यांच्या प्रवासाऐवजी दोन महिन्यांच्या काळात मानवाला मंगळावर पोहचवू शकते. NASA च्या इनोव्हेटिव्ह ॲडव्हान्स्ड कन्सेप्ट्स ( NIAC ) कार्यक्रमाने अलीकडेच अतिरिक्त निधी आणि विकासासाठी सहा महत्वाचे प्रकल्प निवडले आहेत, त्यामुळे या प्रकल्पाला फेज 2 मध्ये जाण्याची परवानगी मिळाली आहे.
NASA मधील NIAC प्रोग्राम एक्झिक्युटिव्ह जॉन नेल्सन यांनी नवीन “सायंटिफिक फिक्शन सारख्या कॉन्सेप्ट्सचा उल्लेख केला आहे. यात एक लूनार रेल्वे सिस्टीम, फ्लूड-बेस्ड टेलिस्कोप आणि एक पल्स्ड प्लाझ्मा रॉकेट यांचा समावेश आहे.
अमेरिकेच्या रिझोना येथील होवे इंस्ट्रीज पल्स्ड प्रोपल्शन रॉकेट सिस्टीम ( PPR ) ला तयार करीत आहे. कमी वेळात जास्त वेगात पोहचण्यासाठी पल्स्ड प्लाझ्मा रॉकेट न्यूक्लियर फ्यूजनचा वापर करणार आहे. अणूच्या भंजनाने ऊर्जा निघणार असून आणि थ्रस्ट म्हणजे जोर देण्यासाठी यानाला पुढे ढकलण्यासाठी प्लाझ्माचे पॅकेट तयार केले जाणार आहेत. अंतराळात रॉकेटला पुढे ढकलण्यास मदतकरण्यासाठी प्लाझ्माचा कंट्रोल जेट तयार करणार आहे. नवीन प्रोपल्शन सिस्टीम आणि थ्रस्टसोबत रॉकेट हाय फ्युअल एफिशियन्सीसाठी 5,000 सेंकडच्या इंपल्स ( आयएसपी ) सह 22,481 पाऊंड फोर्स ( 1,00000 न्यूटन ) तयार करु शकतो.
ही काही नवीन कन्सेप्ट नाही. नासाने साल 2018 मध्ये प्लस्ड फिशन-फ्यूजन ( PuFF ) नावाने हे तंत्रज्ञान विकसित करायला सुरुवात केली होती. PuFF थ्रस्ट तयार करण्यासाठी सर्वसाधारण लॅबोरेटरी प्लाझ्माला खूप कमी वेळासाठी हायप्रेशरमध्ये कंप्रेस करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या डिव्हाईसवर अवलंबून असतो. ज्याला जेड-पिंच म्हटले जाते. नासाच्या मते प्लाझ्मा रॉकेट छोटे, सोपे आणि जास्त स्वस्त असते.
प्रोपल्शन सिस्टीमच्या उच्च कार्यक्षमतेमुळे मंगळ ग्रहावरील मानवी मोहीम दोन महिन्यांतच पूर्ण करण्यात मदत मिळू शकते. सध्या वापरली जाणारी प्रोपल्शन सिस्टीम्स साधारणपणे नऊ महिन्यांत मंगळाचा प्रवास पूर्ण करू शकते. अंतराळ प्रवासासाठी मानवाला जितका कमी वेळ लागेल तितके चांगले असेल. यामुळे स्पेस रेडिएशन आणि मायक्रो ग्रॅव्हीटीच्या संपर्कात मानव येईल आणि मानवी शरीरावर होणारे परिणाम कमी होण्यास मदत होईल. प्ल्स्ड प्लाझ्मा रॉकेट मोठे वजनदार रॉकेट अंतराळात घेऊन जाण्यास सक्षम असणार आहे. ज्यानंतर बोर्डवर क्रुसाठी गॅलेक्टीक कॉस्मिक रेज विरोधात ढाल देखील जोडली जाऊ शकते.