नवी दिल्ली: नागालँड विधानसभेत तब्बल 58 वर्षानंतर राष्ट्रगीत वाजवण्यात आलं. या घटनेची नोंद नागालँडच्या इतिहासात झाली आहे. 12 फेब्रुवारीला नागालँडच्या विधानसभेत हा ऐतिहासिक प्रसंग घडला. 13 व्या विधानसभेच्या सातव्या अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रगीतानं झाली. विधानसभेत राष्ट्रगीत म्हटलं गेलं नागालँडसाठी ऐतिहासिक घटना ठरलीय. (National Anthem was played in the Nagaland Assembly first time )
Pl see the video below. At first glance, perfectly normal scene, right? But you will be amazed, like I was, to know that this was for the first time that the National Anthem was played in the Nagaland Assembly. Just for the record, Nagaland became a State on 1 December 1963 pic.twitter.com/70s6Q20d1N
— Nitin A. Gokhale (@nitingokhale) February 19, 2021
नागालँडच्या विधानसभेचे कमिशनर आणि सचिव पी.जे. अँटनी यांनी 13 व्या विधानसभेच्या पहिल्या दिवशी राज्यपालांच्या अभिभाषणापूर्वी आणि नंतर राष्ट्रगीत वाजवल्यात सांगितले. देशातील अधिक राज्यामध्ये विधानसभेच्या कामकाजापूर्वी राष्ट्रगीत म्हणण्याची परंपरा आहे. पण, नागालँडमध्ये यापूर्वी राष्ट्रगीत वाजवण्याची परंपरा नव्हती. 2007 मध्ये नागालँडची विधानसभा नव्या इमारतीत स्थलांतरित झाली.
शरिंगेन लॉन्गकुमर यांनी विधानसभेत राष्ट्रगीत म्हटलं गेलं यावर प्रतिक्रिया दिली आहे. राज्यपालांच्या अभिभाषणापूर्वी राष्ट्रगीत म्हटलं जावं, अशी भूमिका मांडली होती. त्यानंतर सरकारनं माझा प्रस्ताव स्वीकरला, असं शरिंगेन लॉन्गकुमर म्हणाले.
नागालँड 1950 पर्यंत अंतर्गत संघर्षाशी लढत होता. 1963 पर्यंत नागालँड आसामा राज्याचा भाग होता. त्यांनतर 1 डिसेंबर 1963 ला नागालँडला स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्यात आला. त्यावेळी कोहिमा शहराला राज्याची राजधानी ठरवण्यात आलं.
नागालँडमध्ये 1964 मध्ये निवडणूक झाल्यानंतर राज्य सरकार सत्तेवर आले. त्यानंतर फेब्रुवारी 1964 मध्ये विधानसभा गठित झाली होती. नागालँडच्या विधानसभेला 58 वर्ष पूर्ण झाली. 12 फेब्रुवारीला राष्ट्रगीतानं अधिवेशनाची सुरुवात झाली. हा क्षण अभिमानास्पद ठरला.
संबंधित बातम्या:
AUS vs IND 3rd Test | राष्ट्रगीत सुरु झालं अन् मोहम्मद सिराजच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले
विधानसभा अध्यक्षपदाच्या राजीनाम्यानंतर नाना पटोलेंची पहिली प्रतिक्रिया, आता पुढे काय?
(National Anthem was played in the Nagaland Assembly first time)