Delhi : वाढीव कमिशनसाठी रेशन वितरक संघटनांचे देशव्यापी आंदोलन, पंतप्रधान मोदी यांचे बंधूही होणार सहभागी

| Updated on: Jun 09, 2022 | 3:46 PM

रेशन वितरकांना धान्य वितरीत केल्यानंतर जो मोबदला दिला जातो यामध्ये वाढ कऱण्यासाठी हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. 4 जुलै रोजी तालुका स्तरावर वितरक हे आंदोलन करणार आहेत तर 11 जुलै रोजी जिल्हास्तरावर आंदोलन केले जाणार आहे. दरम्यान यावेळी मागण्यांचे निवेदन हे जिल्हा प्रशासनाला दिले जाणार आहे.

Delhi : वाढीव कमिशनसाठी रेशन वितरक संघटनांचे देशव्यापी आंदोलन, पंतप्रधान मोदी यांचे बंधूही होणार सहभागी
रेशन वितरक
Follow us on

दिल्ली : (Ration Shop) रेशन दुकानाच्या माध्यमातून वितरीत करण्यात येणाऱ्या मालाच्या बदल्यात कवडीमोल (Commission) कमिशन मिळत आहे. रेशन दुकानातून तांदूळ, गहू आणि साखरेचे वितरण होते. सर्वसामान्य ग्राहकांना यामध्ये सूट मिळत असली तरी ज्यांच्यामाध्यमातून (Distribution of grains) धान्याचे वितरण होते त्यांच्याच पदरी काही पडत नाही. देशभरातील रेशन दुकानदारांच्या समस्या घेऊन देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत ऑल इंडिया रेशन वितरक संघटनेची पत्रकार परिषद पार पडली असून वाढीव कमिशनसाठी या संघटनेच्या माध्यमातून देशव्यापी आंदोलन उभारले जाणार आहे. या पत्रकार परिषदेमध्ये आंदोलनाचे स्वरुप कसे असेल याचा लेखाजोखा तर देण्यात आलाच शिवाय या आंदोलनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मोठे बंधू प्रल्हाद मोदी हे देखील सहभागी होणार आहेत.

असे असणार देशव्यापी आंदोलन

रेशन वितरकांना धान्य वितरीत केल्यानंतर जो मोबदला दिला जातो यामध्ये वाढ कऱण्यासाठी हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. 4 जुलै रोजी तालुका स्तरावर वितरक हे आंदोलन करणार आहेत तर 11 जुलै रोजी जिल्हास्तरावर आंदोलन केले जाणार आहे. दरम्यान यावेळी मागण्यांचे निवेदन हे जिल्हा प्रशासनाला दिले जाणार आहे. तर 18 जुलै रोजी राज्याच्या राजधानीच्या ठिकाणी हे आंदोलन केले जाणार आहे. तर 2 ऑगस्ट रोजी देशाची राजधानी दिल्ली येथील रामलीला मैदनावर आंदोलन केले जाणार आहे. स्थानिक पातळीपासून ते देश पातळीपर्यंत मागण्या मांडल्या जाणार असून यामधून योग्य तोडगा हा काढला जाणार आहे.

एलपीजी गॅस खाद्यतेल वितरण करण्याची परवानगी द्या

सध्या रेशन दुकानाच्या माध्यमातून तांदूळ, गहू आणि साखरेचे वितरण केले जात आहे. वितरीत कऱण्यात येत असलेल्या अन्नधान्यातून वितरकांना अपेक्षित कमिशन मिळत नाही. त्यामुळे या धान्याबरोबर रेशनच्या माध्यमातून एलपीजी गॅस आणि खाद्यतेलाचेही वितरण करण्याची परवानगी दिली तर ग्राहकांना तर दिलासा मिळेलच पण वितरकांनाही त्यामधून चार पैसे मिळतील.

हे सुद्धा वाचा

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाऊही सहभागी

देशभर महिनाभर सुरु राहणाऱ्या या आंदोलनाचा शेवट हा दिल्ली येथील रामलीला मैदनावर 2 ऑगस्ट रोजी होणार आहे. विशेष म्हणजे येथील आंदोलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी हे देखील सहभागी होणार आहेत. त्यामुळे देशभरातील रेशन वितरकांच्या मागण्या मान्य होणार का हे पहावे लागणार आहे.